सतेज पाटील यांचं नाव वापरून महिलेची फसवणूक; ‘एवढ्या’ लाखांचा घातला गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सतेज पाटील यांचे नाव वापरून पुण्यातील एका महिलेला लाखों रुपयांचा गंडा (fraud) घालण्यात आला आहे. सुजाता राकेश चंद्र असे या महिलेचे नाव असून तिला विज्ञान विद्या लिमिटेड कंपनीच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी एका मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता होती. याकरता त्यांनी अनेक इन्वेस्टरकडून लोन (fraud) मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र एक वर्षापासून कोणीच लोन देण्यास तयार नव्हतं. यानंतर तिने ओळखीचे असलेले अशोक जाधव यांच्यासोबत चर्चा केली असता जाधव याने थोड्याच दिवसांनी फोन करून एक इन्वस्टर असल्याचं सांगितलं. नंतर जाधव यांनी विनायक शंकरराव पाटील यांच्याशी या महिलेची ओळख करून दिली

विनायक पाटील याने आपल्याकडे मोठा इन्वेस्टर असून आपल्याला लागणारे लोन (fraud) उपलब्ध करून देईल, असं सांगितलं. यानंतर विनायक पाटील याने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याशी आपली ओळख असल्याचं सांगून आपणास लोन उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं. मात्र लोन उपलब्ध करून देताना आपल्याला कमिशन द्यावे लागेल आणि ते अडीच लाख रुपयांचे (fraud) असेल असे त्याने यावेळी त्या महिलेला सांगितले. यानंतर या महिलेने त्याला अडीच लाख रूपये दिले. यानंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीने कागदपत्रात त्रुटी असून लोन मंजूर होणार नसल्याचं सांगितलं. यानंतर आपणास काही तारण ठेवावं लागेल असे त्याने सांगितले. मात्र महिलेने आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं तारण नसल्याने आता तुम्हीच यावर काहीतरी तोडगा काढावा, असे सांगितले.

यानंतर विनायक पाटील याने महिलेला म्हटलं की आपल्या एका एनजीओकडे साठ एकर जमीन आहे. त्या संबंधित जमिनीवर आपल्याला लोन उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. परंतु सदर जमिनीवर लोन उपलब्ध करून देताना आपल्याला त्यावरील कमिशन द्यावे लागेल असेसुद्धा विनायक पाटील याने सांगितले. यानंतर या महिलेकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ती यासाठीसुद्दा तयार झाली. आपली लोनची फाईल राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी गेली असून त्यांच्या पीएला कमिशन द्यावे लागेल म्हणून सतेज उर्फ बंटी डी पाटील यांचा पीए असल्याचं भासवून भोसले नावाच्या व्यक्तीने संबंधित महिलेला फोनवर संपर्क केला. मी मंत्र्याचे पीए असून तुमची फाईल मंजूर झाली आहे मात्र त्याकरिता आपणास पैसे द्यावे लागतील असे त्याने सांगितले.

यानंतर या महिलेने कमिशन म्हणून त्या व्यक्तीला एकूण दहा लाख पाच हजार रुपयांचे कमिशन (fraud) दिले. मात्र लोन उपलब्ध होत नसल्याने संशय आल्यावर विनायक पाटील या व्यक्तीच्या दिलेल्या पत्त्यावर महिलेनं संपर्क केला असता, तो पत्ता खोटा निघाला आणि त्याचं मूळ नाव विनायक रामगुडे असल्याचे समोर आले. यानंतर या महिलेने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने या व्यक्तीवर कलम 34 आणि 420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कामोठे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
बीड जिल्हा रुग्णालयात जोरदार राडा, आत्महत्या करणाऱ्या विवाहितेच्या पती आणि सासूला मारहाण

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धरला पंजाबी ढोलवर ठेका

अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलकांची मुंबई मेलवर दगडफेक

मी ईडीच्या चौकशीला तयार, तुमच्यात दम आहे का?

‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Leave a Comment