आता चेकद्वारे पेमेंट करण्याचा मार्ग बदलणार, 1 जानेवारीपासून लागू होणार RBI चा नवीन नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी एक नवीन सिस्टम आणत आहे. RBI ने त्याचे नाव ‘Positive Pay System’ असे ठेवले आहे. त्याअंतर्गत चेक पेमेंटद्वारे 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम भरल्यावर काही महत्त्वाच्या माहितीची पुष्टी करावी लागेल. मात्र, या सुविधेचा लाभ घेणार आहे की नाही हे खातेधारकावर अवलंबून असेल. परंतु बँका चेकद्वारे 5 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम भरण्यासाठी ही सुविधा अनिवार्य करेल अशी शक्यता आहे.

Positive Pay System कसे काम करेल?
Positive Pay System अंतर्गत जो चेक देईल त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, पैसे देणारी व्यक्ती (Payee) व पेमेंटची रक्कम इत्यादीविषयी पुन्हा माहिती द्यावी लागेल. चेक देणारी व्यक्ती SMS, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकते.

यानंतर, चेक पेमेंट करण्यापूर्वी या माहितीची उलट तपासणी केली जाईल. त्यात काही दोष आढळल्यास त्यास ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’ (CTS – Cheque Truncation System) च्या सहाय्याने ड्रॉ बँक (ज्या बँकेत चेक पेमेंट करायचे आहे) आणि प्रेझेटिंग बँक (ज्या बँकेतून चेक देण्यात आला आहे) त्यावर चिन्हांकित करून माहिती दिली जाईल. अशा परिस्थितीत आवश्यक ती पावले उचलली जातील असे RBI ने म्हटले आहे. त्याच प्रकारे, आणखीही बरेच काही आहेत.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) Positive Pay System साठी CTS मध्ये एक नवीन सुविधा विकसित करेल. यानंतर ती सर्व बँकांना उपलब्ध करुन दिली जाईल.

लोकांना जागरूक करण्यावर भर
रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे की, 1 जानेवारी 2021 पासून ही Positive Pay System लागू केली जाईल. यासह लोकांना या फिचर विषयी लोकांना माहिती देण्यासाठी पुरेशी जागरूकता वाढविण्याचा सल्ला बँकांना देण्यात आला आहे. बँका SMS अलर्टद्वारे, शाखा, एटीएम, वेबसाइट्स आणि इंटरनेट बँकिंगद्वारे हे करू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment