दिल्ली-मुंबई व्यतिरिक्त ‘या’ मार्गांवर चालविली जाणार ताशी 130 किमी वेग असणारी ट्रेन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे लवकरच स्पेशल गाड्यांमधील एसी कोच ट्रेन्स मुख्य मार्गांवर चालवणार आहे. या निर्णयावर रेल्वेचा असा युक्तिवाद आहे की, 130 किमी वेगाने गाड्या चालवण्याची गरज आहे. लवकरच अशा रेल्वेगाड्यांचे डबे रेल्वे कोच फॅक्टरीत तयार होतील. प्रोटोटाइप काय असेल या संदर्भात प्रवाशांचे अभिप्राय आणि सल्ले यानंतरच ही योजना मोठ्या प्रमाणात राबविली जाईल.

दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता मार्गावर धावण्यासाठी पहिली एसी ट्रेन
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सध्या दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता हा मार्ग 130 किलोमीटर स्पीडच्या ट्रेनसाठी तयार करण्यात आला आहे. त्यानंतर अशा गाड्या गोल्डन क्वाड्रीलॅटरल आणि गोल्डन डायगोनलवर रेल्वे दिल्ली-मुंबई-चेन्नई आणि कोलकाता यांना जोडतील. या संपूर्ण प्रकरणावर रेल्वेचा असा युक्तिवाद आहे की, स्लीपर क्लास आणि जनरल क्लासमधील वेगवान गाड्या प्रवाशांना त्रास देऊ शकतात आणि प्रवाशांच्या समस्येमुळे या गाड्यांचा वेगही वाढवता येणार नाही.

एसी कोचमध्ये लवकरच रॅक तयार केले जाईल
रेल्वेचे म्हणणे आहे की, एसी कोचसह 25 डब्यांच्या रॅक लवकरच तयार केले जाईल आणि येणाऱ्या काळात त्यात आणखी वाढही करण्यात येईल. हे रॅक कपूरथळा कोच फॅक्टरीत बनवले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एसी गाड्यांचा रेल्वेच्या नव्या टाइम टेबलमध्ये समावेश करण्यात येईल आणि रॅक तयार झाल्यामुळे त्या गाड्याही सुरू करण्यात येतील. म्हणजेच कोणतीही नवीन ट्रेन येत्या काळात स्पेशल मार्गावर सुरू होईल, तेथे स्लीपर क्लास किंवा सामान्य डब्यांचा बॉक्स असणार नाही.

गरीब रथांसारखे असतील कोच
दुसरीकडे, रेल्वे नवीन एसी-3 क्लास कोचही तयार करीत आहे. जे स्लीपर क्लास आणि एसी क्लासच्या भाड्यांमधील फरक कमी करेल. या एसी कोचमध्ये जास्त बर्थ लावण्यात येणार आहे. जेणेकरुन रेल्वे प्रवासी स्लीपर कोचपेक्षा थोड्या जास्त किंमतीवर एसी कोचचा आनंद घेऊ शकतील. कोच गरीब रथ ट्रेनच्या कोचसारखाच असेल. गरिबांना कमी पैशात एसीमध्ये प्रवास करून आनंद घेता यावा यासाठी ही सुरुवात केली जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. रेल्वेने म्हटले आहे की, त्यांच्या नेहमीच्या गाड्या देखील सुरूच राहतील, मात्र त्यांचा वेग कमी होईल. म्हणजेच, प्रवाशांना 130 किमी स्पीड सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवास करावा लागला तर त्यांच्याकडे फक्त एसी क्लासचाच पर्याय असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment