SBI-HUL करार! आता किरकोळ विक्रेत्यांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंतच्या पेपरलेस ओव्हरड्राफ्टची सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) यांच्यात डिजिटल पेमेंट सोल्यूशनवर (Digital Payment Solution) एक करार झाला आहे. त्याअंतर्गत, HUL च्या किरकोळ विक्रेत्यांना (Retailers) डिजिटल पेमेंट आणि फायनान्सिंग सॉल्यूशन उपलब्ध करून त्यांची आवश्यकता पूर्ण केली जाईल. हा करार छोट्या शहरांमध्येदेखील किरकोळ विक्रेत्यांना आणि HUL च्या ग्राहकांना डिजिटल सोल्यूशन प्रदान करेल. या कराराअंतर्गत आता बँक कंपनीच्या विक्रेत्यांना 50 हजार रुपयांपर्यंतच्या इन्स्टंट पेपरलेस ओव्हरड्राफ्टची सुविधा आणि डिस्ट्रीब्यूटर्सना फायनान्सिंग सॉल्यूशन उपलब्ध करून देईल.

छोट्या शहरांमध्येही ग्राहक डिजिटल पेमेंट करण्यास सक्षम होतील
SBI छोट्या शहरांमधील SBI टच पॉइंट्सवर आपले पॉईंट ऑफ सेल (POS) मशीन इन्स्टॉल करतील. याव्यतिरिक्त, SBI आता HUL च्या किरकोळ विक्रेत्यांना UPI आधारित सॉल्यूशन देईल, जेणेकरून ते त्यांच्या डीलर्सला कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरक्षित कॅशलेस पेमेंट्स करू शकतील. यासाठी त्यांना HUL चे रिटेलर ऐप्लीकेशन शिखर वापरावे लागेल. HUL च्या कर्मचार्‍यांना बँक कॉर्पोरेट सॅलरी पॅकेजचा पर्यायसुद्धा देईल. SBI च्या मायक्रोसाईटच्या माध्यमातून ती सादर केली जाईल, जी कंपनीच्या इंटरानेटवर असेल.

SBI अंतिम ग्राहकांसाठी काम करते
देशातील सर्वात मोठी कर्जदाता SBI चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, HUL शी झालेल्या या करारामुळे बँकेच्या शेअरहोल्डर्सना एक व्यापक आणि कस्टमाइज्ड शॉपिंगचा अनुभव मिळेल. SBI नेहमीच आपल्या शेवटच्या ग्राहकांसाठी (End User) काम करत असते. HUL एसबीआयला ग्राहक, विक्रेते, डीलर्स आणि कर्मचार्‍यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्याच्या भक्कम ब्रांच चेन आणि डिजिटल सोल्यूशन्सचा लाभ घेण्याची संधी प्रदान करीत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment