१२ वर्षाच्या वयात केवळ साठवलेल्या पैशातून तिने ३ मजुरांचे विमानाचे तिकीट काढले 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलांनी आपल्या साठवलेल्या पैशातून गरीब लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या पॉकेटमनीत मिळालेल्या पैशातून एका मुलीने असेच एक कौतुकास्पद काम केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या काळात संचारबंदीमुळे मजुरांचे होणारे हाल ती सातत्याने दूरदर्शनवरून पाहत होती. आणि आपण ही आपली जबाबदारी म्हणून काहीतरी केले पाहिजे म्हणून तिने चक्क तिच्या साठवलेल्या पैशातून ३ मजुरांना घरी जाण्यासाठी विमान तिकिटाचा खर्च केला आहे. केवळ १२ वर्षाच्या वयात तिच्या या कामामुळे निहारिका द्विवेदी ही मुलगी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.

दिल्लीतील नोएडा येथे राहणारी निहारिका म्हणते, “समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, त्यामुळे या संकटकाळात आपण त्याची परतफेड करणे ही आपली जबाबदारी आहे.” आठवीत असणाऱ्या या मुलीने तीन मजुरांना आपल्या झारखंडमधील गावी जाण्यासाठी विमान तिकीट काढून दिले आहे. ज्याचा खर्च साधारण ४८ हजार इतका आहे. या तीन मजुरांपैकी १ मजूर कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे.

 

निहारिकाच्या आई सुरभी यांनी सांगितले की, “जेव्हा ती दूरदर्शनवर अशा बातम्या बघायची तेव्हा खूप दुःखी व्हायची, तिने एकदा आम्हाला विचारले की आपण याना विमानाने पाठवू शकतो का आम्ही हो म्हंटल्यावर तिने आम्हाला तिच्याकडचे पैसे आणून दिले. आम्हाला एका मित्राकडून तीन मजुरांना झारखंड ला जायचे आहे आणि त्यांच्यापैकी एकजण कॅन्करग्रस्त असल्याची माहिती मिळाली. मग आम्ही त्यांचा तिकीट खर्च केला.” इतक्या लहान वयात इतका समंजस पणा यामुळे तिचे सर्वत्र कोतुक होते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment