दसरा आणि दिवाळीपूर्वी बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना दिली भेट, रद्द केले ‘हे’ शुल्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । सणांच्या हंगामापूर्वी बँक ऑफ बडोदाने रिटेल लोनची ऑफर जाहीर केली आहे. होम लोन (Bank of Baroda Home Loan) आणि कार लोन साठी सध्याच्या लागू दरांमध्ये 0.25 टक्के सवलत देत आहे. याव्यतिरिक्त, बँक प्रोसेसिंग शुल्क देखील माफ करेल. बँक ऑफ बडोदाचे हेड जीएम- मॉर्गिज अँड अदर एसेट्स एच टी सोलंकी म्हणाले की, “आगामी उत्सवाच्या हंगामासाठी या रिटेल लोनची ऑफर आणल्यामुळे आम्ही आमच्या निष्ठावंत ग्राहकांना तसेच बँकेच्या नवीन ग्राहकांना भेट देण्याचा आमचा मानस आहे,”. कार लोन घेण्यावर किंवा होम लोनचे शिफ्टिंग करताना आकर्षक ऑफर देखील देत आहेत. या ऑफर अंतर्गत व्याज दरही कमी ठेवण्यात आले आहेत आणि ग्राहकांना प्रोसेसिंग शुल्कापासून देखील सूट देण्यात आली आहे.

PNB ची नवीन ऑफर- पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर (Festival Bonanza Offer) घेऊन आला आहे. PNB ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर अंतर्गत बँक होम लोन, कार लोन इत्यादी काही प्रमुख रिटेल प्रोडक्टसवर सर्व प्रकारचे अअपफ्रंट, प्रोसेसिंग चार्ज आणि डॉक्यूमेंट चार्ज माफ करेल. 31 डिसेंबर 2020 पर्यंत ग्राहक PNB च्या 10,897 शाखा किंवा डिजिटल चॅनेलद्वारे या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

ग्राहकांना कर्जे स्वस्त आणि सुलभ करण्यासाठी PNB ने नवीन आणि टेकओवर लोनवरील प्रोसेसिंग फीसही कमी केली आहे. निवेदनात म्हटले गेले आहे की, होम लोन वरील ग्राहकांना आता कर्जाच्या रकमेपैकी 0.35 टक्के (जास्तीत जास्त 15,000 रुपये) आणि डॉक्यूमेंट चार्जव्यतिरिक्त सवलत मिळेल. त्याचप्रमाणे कार लोनवर ग्राहक एकूण कर्जाच्या रकमेपैकी 0.25 टक्के बचत करतील. त्याचप्रमाणे लोन अगेंस्ट प्रॉपर्टीच्या आधारे ग्राहकांना कर्जाच्या रकमेनुसार 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment