रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी: पुढच्या वर्षी असणार ट्रेनमध्ये नवीन AC कोच, त्यासाठीचे भाडे किती असेल हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी सांगितले की, AC 3-टियर च्या कोचसाठी नवीन डिझाईन करण्यात आली आहे. हा नवीन AC 3-टियर कोच पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. यामध्ये स्लीपर आणि AC 3 दरम्यानचे भाडे निश्चित केले जाईल. अधिकाधिक लोकांना AC ची सुविधा पुरविणे हा यामागील मुख्य हेतू असल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, AC 3-टियर बर्थमध्ये 72 बर्थ ऐवजी 83 बर्थ असतील. सुरुवातीला या कोचना AC 3-टियर टूरिस्ट क्लास देखील म्हटले जाईल. या गाड्यांचे भाडेदेखील स्वस्त असणार आहे जेणेकरून प्रवासी यातून प्रवास करू शकतील. पहिल्या टप्प्यात असे 230 कोच तयार केले जातील.

स्लीपर क्लास कोच काढले जाणार नाहीत – व्हीके यादव म्हणाले की, सध्या गाड्यांचा स्पीड वाढविला जात आहे. आतापर्यंत हे ताशी 110 किमी वेगाने धावत आहेत. त्याचबरोबर, जून 2021 पर्यंत या गाड्या नवी दिल्ली ते मुंबई आणि नवी दिल्ली ते कोलकाता या ताशी 130 किमी वेगाने धावतील. स्लीपर क्लास कोच काढून टाकण्याची सध्यातरी कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी सांगितले.

अशी योजना यापूर्वीच तयार केली गेली होती- 2004-09 दरम्यान यूपीए -1 सरकारच्या काळात इकोनॉमिकल AC 3-टियर क्लास कोच तयार करण्याची योजना तयार केली गेली होती. त्याच वेळी गरीब रथ एक्सप्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना एसी इकॉनॉमी क्लास म्हणतात. मात्र, यामध्ये प्रवासादरम्यान अडचणी होत असल्याबद्दल प्रवाशांनी सांगितले. त्याचबरोबर रेल्वेमध्ये गर्दीची होऊ लागली. त्यानंतर अशा कोचचे प्रोडक्शन थांबविण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment