PPF, NSC सुकन्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार आज व्याजदराबाबत घेणार निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । अर्थ मंत्रालय 30 सप्टेंबर 2020 रोजी लघु बचत योजनांच्या व्याजदराबाबत निर्णय घेणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत अल्प बचत योजनेवरील व्याज दर कमी केल्या जाऊ शकतील. नुकतेच आरबीआयने व्याज दर कमी केल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, बॉन्ड यील्ड  कमी स्तरावर आहे. अशा परिस्थितीत व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2016 पासून केंद्र सरकार अल्प बचत योजनेचा त्रैमासिक आधारावर आढावा घेते आणि व्याज दर ठरवते. त्याच वेळी, पूर्वीचे व्याज दर हे वार्षिक आधारावर बदलले जात होते.

PPF व्याज दर – एप्रिल ते जून 2020 च्या तिमाहीत सरकारने PPF वरील व्याज दर 0.8 टक्क्यांनी कमी केले होते. त्याच वेळी, चालू तिमाहीत म्हणजे जुलै ते ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान व्याज दर हे 7.1 टक्के आहेत.

या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर लोकांना मासिक उत्पन्न योजना (MIS) मध्ये 6.6 टक्के दराने व्याज मिळणार आहे. NSC – नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवरील व्याज 6.8 टक्के आहे. KVP-किसान विकास पत्राला 6.9 टक्के दराने व्याज मिळत आहे. सुकन्यावरील व्याजदर 7.6 टक्के आहेत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धि योजनेवरील व्याज दर सरकार बदलत असते आणि ते त्यानुसारच लागू मानले जातात. मात्र जर आपण टाइम डिपॉजिट, पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉजिट, पोस्ट ऑफिस  मासिक उत्पन्न योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि किसान विकास पत्र (KVP) मध्ये ज्या व्याज दरावर गुंतवणूक केली असेल तर तेच व्याज दर हे संपूर्ण योजनेच्या कालावधीत उपलब्ध राहील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment