शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, SEBI ने दिली नवीन नियमांना मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांच्या ई-केवायसी आधार प्रमाणीकरणासाठी (Authentication) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ला मान्यता दिली आहे. यामुळे सेबीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL), नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), सीडीएसएल व्हेंचर्स, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट, एनएसई डेटा आणि एनालिटिक्स, सीएएमएस इन्व्हेस्टर सर्व्हिसेस आणि कम्प्यूट एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) ला याची परवानगी दिलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आता NSE ला गुंतवणूकदारांचे ई-केवायसी करण्याचा हक्क मिळाला आहे.

NSE ला UIDAI मध्ये केवायसी वापरकर्ता म्हणून नोंदणी करावी लागेल
सेबीने एक सर्कुलर जारी केले आहे, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या संदर्भातील निर्धारित अटींचे पालन करण्यासाठी UIDAI च्या आधार प्रमाणीकरण सेवा म्हणून काम करेल. यासाठी NSE ला UIDAI मध्ये केवायसी वापरणारी एजन्सी (KUA) म्हणून रजिस्‍ट्रेशन करावे लागेल. UIDAI कडे रजिस्‍ट्रेशन करून सेबीमध्ये रजिस्‍टर्ड इंटरमीडियरीज किंवा म्युच्युअल फंड डिस्‍ट्रीब्‍यूटर्सना ( MF Distributors ) त्यांच्या ग्राहकांना केवायसी करण्याचा अधिकार मिळेल.

इंटरमीडियरीज किंवा MF Distributors चा KUA सह करार
सेबीमध्ये रजिस्‍टर्ड इंटरमीडियरीज किंवा MF Distributors , जे KUA मार्फत आधार प्रमाणीकरण सेवा वापरू इच्छित आहेत, त्यांना KUA बरोबर करार करावा लागेल. तसेच KUA कडे Sub-KUAs म्हणून रजिस्‍ट्रेशन करावे लागेल. हा करार यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ठरवलेल्या मानकांवर आधारित असेल. वेळोवेळी KUA आणि Sub-KUAs ला UIDAI ने सांगितलेली केलेली प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. सीडीएसएलला ऑगस्टमध्ये UIDAI आणि सीडीएसएल व्हेंचर्सकडून स्थानिक ऑथेंटिकेशन यूजर एजेंसी (AUA) किंवा केयूए म्हणून जुलैमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment