आता 1 नोव्हेंबरपासून बदलणार LPG Cylinder च्या Home Delivery ची सिस्टम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । आता तुमच्या एलपीजी सिलेंडरच्या होम डिलिव्हरीची प्रक्रिया (LPG Cylinder Home Delivery) पूर्वीसारखी राहणार नाही कारण पुढच्या महिन्यापासून डिलीव्हरी सिस्टीम बदलणार आहे. डोमेस्टिक सिलेंडर (Domestic Cylinder) ची चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी तेल कंपन्या 1 नोव्हेंबरपासून नवीन LPG सिलेंडर डिलीव्हरी सिस्टीम लागू करणार आहेत. ही नवीन सिस्टीम काय आहे आणि आता होम डिलीव्हरी कशी होईल, हे आपण जाणून घेउयात…

> या नवीन सिस्टीम चे नाव DAC म्हणजेच डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असे ठेवले गेले आहे. आता, फक्त बुकिंग करून, सिलेंडरची डिलीव्हरी होणार नाही, मात्र आता आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक कोड पाठविला जाईल, जोपर्यंत आपण डिलीव्हरी करणाऱ्याला तो कोड दाखवणार नाही तोपर्यंत ती डिलीव्हरी पूर्ण होणार नाही.

> तथापि, असा एखादा ग्राहक असेल ज्याने डिस्ट्रीब्यूटरकडे मोबाइल नंबर अपडेट केला नसेल तर डिलिव्हरी बॉयकडे एक अॅप असेल ज्याद्वारे आपण आपला नंबर रिअल टाइममध्ये अपडेट करू शकाल आणि त्यानंतर कोड जनरेट करण्यात सक्षम होईल.

> अशा परिस्थितीत ज्यांचे पत्ते चुकीचे आहेत आणि मोबाईल नंबर चुकीचा आहे अशा ग्राहकांच्या अडचणी वाढल्या जातील, त्यामुळे त्या सिलेंडरची डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते.

> तेल कंपन्या पहिल्या 100 स्मार्ट शहरांमध्ये ही सिस्टीम लागू करणार आहेत. यानंतर, उर्वरित हळूहळू दुसर्‍या शहरात देखील लागू केले जाऊ शकते. जयपूरमध्ये आधीच त्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू आहे.

> या प्रोजेक्ट मध्ये तेल कंपन्यांना 95 टक्क्यांहून जास्त सक्सेस रेट मिळालेला आहे. हे सिस्टीम कमर्शियल सिलेंडर्सवर लागू होणार नाही, हे नियम केवळ डोमेस्टिक साठीच लागू होतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment