आता बिस्किटे खाण्यासाठी तुम्हांला मिळतील पैसे, ‘ही’ कंपनी वर्षाकाठी देत आहे 40 लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नोकरीबद्दल प्रत्येकाची स्वप्ने वेगवेगळी असतात. चांगल्या पगारासह नोकरीमध्ये थोडी मजा आणि विश्रांती मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र आता प्रश्न असा निर्माण होतो की, अशी नोकरी मिळणे शक्य आहे काय? बिस्किटे खाण्यासाठी जर तुम्हाला 40 हजार पौंड (अंदाजे 40 लाख रुपये) चे वार्षिक पॅकेज मिळाल्यास आपण काय कराल याची कल्पना करा. होय, स्कॉटलंडची एक बिस्किटे बनवणारी कंपनी ‘बॉर्डर बिस्किट्स’ (Border Biscuits) ‘अशाच काही प्रकारच्या नोकर्‍या देत आहे.

पोस्टचे नाव – मास्टर बिस्किटर
वास्तविक, या कंपनीने तत्सम नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. ‘बॉर्डर बिस्किट्स’ स्वतःसाठी ‘मास्टर बिस्किटर’ (Master Biscuitier) शोधत आहे. ‘इंडिपेन्डंट’ वेबसाइटच्या वृत्तानुसार, बिस्किटे खाण्यासाठी ही कंपनी सुमारे 40 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देईल. हि फुल टाईम नोकरी असेल आणि वर्षाला 35 दिवस सुट्ट्या देखील उपलब्ध असतील. नक्कीच, बिस्किटे देखील फ्रीमध्ये उपलब्ध असतील.

https://www.instagram.com/p/CGPkk3gjDC_/?utm_source=ig_embed

उमेदवारांमध्ये असे गुण शोधत आहेत
इच्छुक उमेदवारांना चव आणि बिस्किट उत्पादनाची सखोल माहिती असणे तसेच नेतृत्व आणि कम्युनिकेशन स्किलमध्ये तज्ज्ञ असणे महत्वाचे आहे. ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे मनोरंजक मार्ग सुचविणार्‍या उमेदवारांना या नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल.

‘बॉर्डर बिस्किट्स’ चे एमडी पॉल बार्किन्स म्हणाले, “आम्ही देशभरातील लोकांना यासाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करीत आहोत आणि काही चांगले उमेदवाराना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.” कंपनीचे ब्रँडचे प्रमुख सुजी कार्ला सांगतात. कंपनी ग्राहकांना उत्तम चव असलेली दर्जेदार बिस्कीटे देण्यास वचनबद्ध आहे. ही वचनबद्धता पूर्ण करण्यासाठी त्याला नवीन ‘मास्टर बिस्किटर’ आवश्यक आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment