सोन्या-चांदीच्या स्पॉटच्या किंमतीत झाली लक्षणीयरित्या घट, कसे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सोने -चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये घसरणीची नोंद झाली. शुक्रवारी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीत प्रति 10 ग्रॅम 271 रुपयांची घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 49,729 रुपयांवर आली आहे. सिक्युरिटीजच्या मते भारतीय रुपयाच्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीतील ही घसरण नोंदली गेली. विशेष म्हणजे, मागील सत्रात गुरुवारी सोने हे प्रति10 ग्रॅम 50,000 वर ​​बंद झाले होते.

शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. देशांतर्गत सराफा बाजारात चांदीच्या स्पॉट किंमतीत शुक्रवारी प्रतिकिलो 512 रुपयांची घसरण नोंदली गेली. किंमतींच्या या घसरणीमुळे चांदीचा दर प्रति किलो 53,382 रुपये इतका झाला आहे. विशेष म्हणजे, मागील सत्रात चांदीचा भाव गुरुवारी 53,894 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी भारतीय रुपया एका डॉलरच्या तुलनेत 16 पैशांच्या वाढीसह 75.02 वर बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारात वाढ झाल्याने आणि अमेरिकन चलन कमकुवत झाल्याने रुपया मजबूत झाला आहे.

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर शुक्रवारी सायंकाळी सोन्याचा जागतिक वायद्याचा भाव हा कॉमेक्सवर 0.48 टक्क्यांनी किंवा 8.60 डॉलरने वाढून 1808.90 डॉलर प्रति औंस झाले. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औंस 1807.08 डॉलरवर वधारत असून ते ०.55 टक्क्यांनी किंवा 9.92 डॉलरने वाढले आहे.

दरम्यान, चांदीचा जागतिक वायद्याचा भाव हा कॉमेक्सवर 0.16 टक्के म्हणजेच 0.03 डॉलर प्रति औंस 19.61 डॉलरवर होता. याखेरीज चांदीचा भाव प्रति औंस 19.20 डॉलरवर होता, तो 0.22 टक्के किंवा 0.04 डॉलरने वाढला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment