पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर लागला ब्रेक! आजच्या किमती जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । देशातील अनेक राज्यांत पेट्रोलचे दर प्रति लिटर 90 रुपयांवर पोचले आहेत. त्याचबरोबर डिझेलची किंमतही कमी झालेली नाही आहे. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) आज सलग सातव्या दिवशी इंधन दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. शुक्रवारी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 08 पैशांची कपात करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात एक दिवस वगळता इंधनाच्या दरात बदल करण्यात आला. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये पेट्रोलच्या किंमतीत निरंतर वाढ झाली होती. जुलै महिन्याबद्दल बोलतांना, या महिन्यात डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती.

शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर राहिले. पेट्रोल डिझेल दर दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. आपण याबाबदल SMS द्वारेही माहिती मिळवू शकता. आयओसीएलकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल आणि डिझेलची किंमत खालीलप्रमाणे आहे.

सप्टेंबरमध्ये पेट्रोल 1.19 रुपयांनी झाले स्वस्त
ऑगस्टच्या दुसर्‍या पंधरवड्यात आज पेट्रोलच्या दरात निरंतर वाढ झाली. राजधानी दिल्लीतच पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 16 आठवड्यांमध्ये एकूण 1 रुपये 65 पैशांची वाढ झाली. तथापि, यामध्ये काही काळ घट देखील झाली आहे. 21 सप्टेंबरपर्यंत तो प्रतिलिटर अंदाजे 1.02 रुपयांनी कमी झाला आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या.
दिल्ली पेट्रोल 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.74 आणि डिझेलची किंमत 76.86 रुपये आहे.
कोलकाता पेट्रोल 82.59 रुपये तर डिझेल प्रति लिटर 73.99 रुपये आहे.
चेन्नई पेट्रोल 84.14 रुपये तर डिझेलची किंमत 75.95 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 81.58 रुपये आणि डिझेल 70.00 रुपये प्रति लिटर आहे.
लखनौ पेट्रोल 81.48 रुपये आणि डिझेल 70.91 रुपये प्रति लिटर आहे.
पटना पेट्रोल 73.73 रुपये तर डिझेल 76.10 रुपये प्रति लिटर आहे.
चंदीगड पेट्रोल 77.99 रुपये आणि डिझेल 70.17 रुपये प्रति लिटर आहे

अशाप्रकारे, दररोज पेट्रोल-डिझेलची किंमत तपासा
पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price)दररोज बदलतात आणि सकाळी 6 वाजता अपडेट होतात. आपल्याला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर देखील माहित होऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP स्पेस पेट्रोल पंप कोड लिहून 9292992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक RSP असे लिहून 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून आणि 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment