BSNL २० हजार कर्मचाऱ्यांना देणार कायमची सुट्टी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी BSNL ने (भारत संचार निगम लिमिटेड) २० हजार कंत्राटी कामगारांना कायमची सुट्टी देणार असल्याचे वृत्त आहे. BSNL कंपनीच्या कर्मचारी संघटनेनं याबाबतची माहिती दिली आहे. बीएसएनएलने याआधीच ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा निर्णय अशा वेळी घेतला गेला आहे जेव्हा या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही. BSNL कर्मचारी संघटनेने कंपनीचे अध्यक्ष वी के पुरवार यांना एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी कंपनीची हालत खूपच नाजूक असल्याचं सांगितलं आहे. शिवाय, ल्या १४ महिन्यापासून पगार दिला नाही. यामुळे १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. VRS योजना अंमलात आल्यानंतर देखील कर्मचाऱ्यांना नियमीत वेळेत पगार दिला जात नाही. असेही सांगितलेय.

BSNL कंपनीच्या एचआरने एक सप्टेंबरला सर्व मुख्य व्यवस्थापकांना खर्चात कपात करण्याचे आदेश दिले. यात कंत्राटी कर्मचारी कमी करण्यास सांगितले होते. त्याच बरोबर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी ठेवण्याची गरज नसल्याचेही म्हटले होते. BSNL कर्मचारी संघटनेचे महासचिव पी अभिमन्यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनीनं ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं आहे. आता नवीन आदेशानुसार २० हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment