भारतातील कोणत्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांची किती गुंतवणूक आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । का आपणास हे ठाऊक आहे की, अनेक भारतीय स्टार्टअपमध्ये चिनी कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स फर्म ग्लोबल डाटाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत चीनच्या भारतीय स्टार्टअप्समधील गुंतवणूकीत 12 पट वाढ झाली आहे. 2016 मध्ये या स्टार्टअप्समध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक ही 381 मिलियन अमेरिकन डॉलर (सुमारे 2,800 कोटी रुपये) होती जी 2019 मध्ये 4.6 बिलियन डॉलर (सुमारे 32 हजार कोटी रुपये) झाली.

भारताच्या या कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक आहे
चीनच्या भारतातील अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक आहे, त्यापैकी स्नॅपडील, स्विगी, उडान, झोमॅटो , बिग बास्केट, बायजू, डेलहीवेरी, फ्लिपकार्ट, हाईक, मेकमायट्रिप, ओला, ओयो, पेटीएम, पेटीएम मॉल , पॉलिसी बाजार हे प्रमुख आहेत.

ग्लोबलडाटाने असे म्हटले आहे की, भारतातील 24 भारतीय स्टार्टअपपैकी 17 स्टार्टअपमध्ये अलीबाबा आणि चीनच्या टेंसेंट सारख्या कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. अलिबाबा आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी पेटीएम, स्नॅपडील, बिगबास्केट आणि झोमॅटोमध्ये 2.6 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर टेंन्सेंटने ओला, स्विगी, हायक, ड्रीम 11 आणि बायजू (बीवायजेयू) या पाच युनिकॉर्नमध्ये 2.4 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या स्टार्टअपची बाजार किंमत ही एक अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक आहे.

भारतीय बाजारात वेगाने वाढ
ग्लोबलडेटाचे मुख्य तंत्रज्ञान विश्लेषक किरण राज म्हणाले की, गेल्या काही वर्षात चीनशी तणाव नसल्यामुळे चीनने अल्पावधीतच भारतीय बाजारामध्ये आपली बरीच वाढ केली आणि भारतीय तंत्रज्ञानाच्या स्टार्ट-अपवर जोरदार डाव लावले, जे खूप फायदेशीर सिद्ध झाले. एका अंदाजानुसार 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या 30 स्टार्ट-अप कंपन्यांपैकी 18 कंपन्यांमध्ये चीनचा वाटा आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, देशातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या अन्य प्रमुख चिनी गुंतवणूकदारांमध्ये मेटुआन-डॅनपिंग, दीदी चुक्सिंग, फोसुन, शुनवे कॅपिटल, हिलहाऊस कॅपिटल ग्रुप आणि चायना-यूरेशिया इकॉनॉमिक को-ऑपरेशन फंड यांचा समावेश आहे.

भारतातील एफडीआयचे नियम कडक केले
अलीकडेच, भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव आणि भारतातील एफडीआयचे (थेट परकीय गुंतवणूक) नियम आणखी कठोर केल्यामुळे चिनी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात गुंतवणूक करण्यास अडचणी येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment