आता कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे दुकानदारावर पडणार भारी ! आपल्या नवीन अधिकारांबद्दल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर आता ग्राहकांना बऱ्याच प्रकारचे हक्क मिळालेले आहेत. ग्राहकांनीही या अधिकाराचा उपयोग सुरू केला आहे. अलीकडेच चंदीगडमधील एका ग्राहकाने कॅरी बॅगसंदर्भात ग्राहक मंचात तक्रार दिली होती. फोरमने या तक्रारीवर मोठा निर्णय दिला. ग्राहकांनी स्टोअरमध्ये असलेल्या कॅरी बॅगबाबत असा आरोप केला होता की खरेदी केलेल्या सामाना सोबत त्याच्या परवानगीशिवाय 5 रुपयांचे कॅरी बॅगमध्ये जोडले गेला. स्टोअरची चूक लक्षात घेऊन ग्राहक मंचाने ग्राहकाला 20 पट अधिक म्हणजे 100 रुपये देण्यास सांगितले.

फोरमने पाच रुपयांच्या कॅरी बॅगवर 20 पट अधिक दंड ठोठावला
आता जर दुकानदार किंवा मोठे स्टोअर्स जर आपल्याकडून कॅरी बॅगसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारत असतील तर सरकार त्यावर कठोर कारवाई करीत आहे. जर तुमच्याकडे कॅरी बॅगच्या नावाखाली पाच रुपये, दहा रुपये आकारले गेले तर ताबडतोब ग्राहक मंचाकडे तक्रार करा. मोदी सरकारने देशातील ग्राहकांना अनेक हक्क दिले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा 2019 गेल्या महिन्यापासून संपूर्ण देशभरात लागू झाला आहे. या नवीन कायद्याने जुना ग्राहक संरक्षण कायदा 1986 ची जागा घेतली आहे.

तब्बल 34 वर्षानंतर, देशात एक नवीन ग्राहक कायदा अस्तित्त्वात आला आहे. या नव्या कायद्यांतर्गत ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयात खटला दाखल करू शकतो. यासह, दिशाभूल करणार्‍या जाहिरातींवर दंड आणि शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. यासह दुकानदारांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या नवीन कायद्यानुसार दुकानदाराने कॅरी बॅगे साठी वेगळे पैसे घेतल्यास आणि ग्राहकाने तक्रार नोंदवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या नव्या कायद्यानुसार कॅरी बॅगसाठी अतिरिक्त पैसे घेणे हे दंडनीय आहे.

जर एखादा ग्राहक वस्तू घेतल्यानंतर कॅरी बॅगची मागणी करत असेल तर त्याला त्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तो ग्राहक वस्तू हातात घेण्यास सक्षम नसेल तर दुकानदारास त्याला कॅरी बॅग द्यावी लागेल. देशातील बर्‍याच ग्राहक मंचांमध्ये याबद्दल तक्रारी आल्या, त्यानंतर ग्राहक मंचने कॅरी बॅगचे पैसे घेतल्याबद्दल स्टोअर किंवा दुकानदाराला दंड करायला सुरुवात केली. आता या नव्या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment