महाबळेश्वरला कोरोनाची धास्ती; व्यावसायिकांना मोठा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखणाऱ्या थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरमध्ये देश-विदेशातून हजारो पर्यटक येत असतात. देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असताना महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसची धास्ती महाबळेश्वरच्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी घेतली आहे. महाबळेश्वरचे नेहमी गजबजलेले मार्केट आज ओस पडलेले दिसत आहे. याचा फटका स्थानिक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. महाबळेश्वरची प्रसिद्ध स्ट्रॉबेरी देखील याला अपवाद नाही.

महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते,यामुळे लाखो रुपयांची उलाढाल उत्पादकांना होत असते. महाबळेश्वर, पाचगणी येथील टेबल लँड,वेण्णा लेक, थंड स्वीट मार्केट,हॉटेल,मॉल्स कोरोनाच्या भीतीने थंडावले आहेत. यावर स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment