कोरोना संकटामुळं भारतामधील ४० टक्के रेस्टॉरंट्स कायमस्वरुपी बंद होण्याची भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । भारतातील लोकप्रिय Online Food Delivery कंपनी झोमॅटोने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतामधील ४० टक्के रेस्टॉरंट्स कायमस्वरुपी बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला १० टक्के रेस्टॉरंट्स ही कायमस्वरुपी बंद झालेली असून उर्वरित ३० टक्के रेस्टॉरंट कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतरही पुन्हा सुरु होतील याची खात्री नाहीये. सध्याच्या घडीला देशभरात फक्त १७ टक्के रेस्टॉरंट्स सुरु आहेत. उर्वरित ८३ टक्क्यातील १० टक्के रेस्टॉरंट ही कायमस्वरुपी बंद तर उर्वरित ३० टक्के ही बंद होण्यच्या मार्गावर असल्याचं झोमॅटोने आपल्या अहवालात म्हटलंय. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका देशभरातील हॉटेल व्यवसायिकांना बसला आहे.

आजही अनेक राज्यांत लॉकडाउन सुरु आहे. त्यातचं विषाणूच्या प्रादुर्भावाची भीती अजुनही लोकांच्या मनात कायम असल्यामुळे लोकं घराबाहेर पडत नाहीयेत. लॉकडाऊनची घोषणा झाल्यापासून भारतीयांनी अंदाजे २० कोटी वेळा हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर दिली आहे. यापैकी ७ कोटीवेळा या ऑर्डर्स झोमॅटोने ग्राहकांपर्यंत पोहचवल्या आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल व्यवसायिकांनी आपला धंदा सुरु रहावा यासाठी होम डिलीव्हरीचा पर्याय सुरु ठेवला आहे.

दरम्यान, ज्या शहरांमध्ये लॉकडाउन हटवण्यात आलेलं असून नियमांमध्ये शिथीलता आणलेली आहे अqशा भागांतही १७ टक्के रेस्टॉरंट्स सुरु आहेत. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या हॉटेल व्यवसायिकांना फार कमी प्रतिसाद मिळत आहे. झोमॅटोच्या अहवालानुसार कोलकाता शहरात सर्वाधिक रेस्टॉरंट सुरु असून त्याखालोखाल चेन्नई शहराचा नंबर लागतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment