जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिरात लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच एका दिवसात मिळाली 1 कोटी रुपयांची देणगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन झाल्यानंतर गेल्या शनिवारी पहिल्यांदाच उघडलेल्या तिरुपती बालाजी मंदिराला त्याच दिवशी 1 कोटीहून अधिक देणगी मिळाली आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) यांनी ही माहिती दिली आहे. कोविड -१९ च्या संकटकाळात सर्वप्रथम भक्तांना मंदिरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, 11 जून रोजी मंदिर यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडले आहे.

मंदिर पुन्हा उघडल्यानंतर हुंडीमध्ये एका दिवसात पहिल्यांदाच 1 कोटींची देणगी मिळाली आहे. टीटीडीने रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी 13,486 भाविक मंदिरात आले आणि त्यांचे अर्पण मोजले गेले.

तिरुपती मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत असे मंदिर आहे. देशातील सर्व मंदिरांच्या तुलनेत या मंदिराला सर्वाधिक रोख, दागिने आणि इतर अनेक देणग्या मिळतात. या मंदिराला दर महिन्याला 200 कोटींपेक्षा जास्त देणगी मिळते. 20 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर मंदिर बंद झाल्यामुळे देणगी थांबली होती. दरमहा 200 कोटींपेक्षा जास्त मिळणार्‍या मंदिरात एक रुपयादेखील दान करण्यात आला नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर 10 जून रोजी मंदिर उघडले गेले आणि पहिल्याच दिवशी 25 लाख रुपयांहून अधिक देणगी आली. तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टच्या मते, लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment