Post office च्या KVP योजनेत करा दुप्पट पैसे – मॅच्युरिटीनंतर तुम्हाला मिळतील 2 लाख ते 4 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूक करणे ही एक चांगली सवय आहे, कारण वाईट काळात आपली साठवलेल भांडवल हे आपल्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरते. परंतु लोकं पैसे कुठे गुंतवावे जेणेकरून ते सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला रिटर्नही मिळेल याच विवंचनेत असतात. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगत आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षितही राहतील तसेच मॅच्युरिटीनंतर डबल रिटर्नही मिळेल. ही पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra- KVP) योजना आहे. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेउयात …

किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक वन टाइम इन्वेस्टमेंट स्कीम आहे, जिथे दिलेल्या कालावधीत आपले पैसे दुप्पट होतात. किसान विकास पत्र हे देशातील सर्व पोस्ट ऑफिसेस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. त्याचा मॅच्युरिटी पिरिअड आता 124 महिने आहे. यामध्ये किमान गुंतवणूक 1000 रुपये आहे. यात गुंतवणूकीची कोणतीही जास्तीत जास्त मर्यादा नाही. ही योजना विशिष्ट शेतकऱ्यांसाठी तयार केली गेली आहे, जेणेकरून ते त्यांचे पैसे दीर्घकाळ वाचवू शकतील.

कोण गुंतवणूक करू शकते?
किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूकीसाठी किमान 18 वर्षे वय असणे आवश्यक आहे. सिंगल अकाउंट शिवाय यात ज्वॉइंट अकाउंटची सुविधादेखील आहे. त्याचबरोबर ही योजना अल्पवयीन मुलांसाठीदेखील उपलब्ध आहे, जी पालकांच्या देखरेखीखाली राहील. ही योजना हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे HUF आणि NRI वगळता ट्रस्टसाठी देखील लागू आहे. किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूक करण्यासाठी 1000 रुपये, 5000 रुपये, 10000 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंतची सर्टिफिकेट आहेत, जी खरेदी करता येतील.

व्याज दर
आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत KVP चा व्याज दर हा 6.9 टक्के निश्चित करण्यात आला आहे. होय, आपली गुंतवणूक 124 महिन्यांत दुप्पट होईल. जर तुम्ही एकूण 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला याच्या मॅच्युरिटीवर 2 लाख रुपये मिळतील. 124-महिन्यांच्या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी असतो. ही योजना आयकर कायदा 80C अंतर्गत येत नाही. तर जे काही रिटर्न्स येईल त्यावर टॅक्स आकारला जाईल. या योजनेत TDS कपात केली जात नाही.

ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील आहे
किसन विकास पत्र जारी केल्याच्या अडीच वर्षानंतर परत मिळू शकेल. KVP एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये देखील ट्रान्सफर केले जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडेही ट्रान्सफर केला जाऊ शकतो. KVP मध्ये नॉमिनीची सुविधा देखील उपलब्ध आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या स्वरूपात जारी केला जातो.

या कागदपत्रांची गरज आहे
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, केव्हीपी अर्ज फॉर्म, पत्ता पुरावा आणि बर्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com