कौतुकास्पद! महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात Zomato देणार रजा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । एका प्रसिद्ध भारतीय कंपनीनं मासिक पाळीच्या काळात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वर्षभरात १० सुट्ट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कंपनी म्हणजे खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणारी Zomato. भारतामध्ये मासिक पाळीबाबत असणारे न्यूनगंड आणि एकंदरच परिस्थिती पाहता कंपनी या निर्णयावर पोहोचल्याचं म्हटलं जात आहे.

‘मासिक पाळीदरम्यान सुट्टी मागण्यास कोणताही संकोचलेपणा किंवा लाज नसली पाहिजे’, असं झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाल्याचं कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये नमूद करण्यात आलं होतं. तुमही मासिक पाळीसाठी सुट्टी घेतल्याचं अंतर्गत विभागांमध्ये काम करणाऱ्यांना सांगण्यात हरकत नसल्याचं मत त्यांनी येथे मांडलं होतं.

जवळपास ५ हजार कर्मचारी संख्या असलेल्या Zomato कडे देशातील लोकप्रिय कंपनी म्हणूनही पाहिलं जातं. कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी या कंपनीची विशेष ओळख आहे. त्यांच्या या निर्णयाविषयी म्हणावं तर, सर्वच स्तरांतून त्याबद्दल चर्चा सुरु असून, निर्णयाचं स्वागत होत आहे. शिवाय इतर कंपन्यांनीही असा निर्णय घ्यावा अशी मागणी काही स्तरांतून केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment