आजपासून बँका, विमा, ई-कॉमर्स सहित बऱ्याच गोष्टी बदलल्या, त्याचा थेट परिणाम आता तुमच्या खिशावर होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 ऑगस्टपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये बर्‍याच गोष्टी स्वस्त होतील तर अनेक गोष्टी महाग. यातील एक बदल म्हणजे देशात अनलॉक 3 मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी. आर्थिक बदलांविषयी बोलताना 1 ऑगस्टपासून बँक कर्ज, पीएम किसान योजना, किमान शिल्लक शुल्काचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून देशात काय बदल होणार आहेत त्याविषयीची माहिती आम्ही तुम्हाला देतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही त्यांकडे लक्ष न दिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

किमान शिल्लक आणि व्यवहाराच्या नियमात बदल: अनेक बँकांनी त्यांची रोख शिल्लक आणि डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी 1 ऑगस्टपासून किमान शिल्लक शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. तसेच या बँकांमध्ये तीन विनामूल्य व्यवहारानंतर शुल्क देखील आकारले जाईल. हे शुल्क 1 ऑगस्टपासून बँक ऑफ महाराष्ट्र, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि आरबीएल बँकेत लागू होणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधील बचत खातेधारकांना त्यांच्या खात्यात मेट्रो आणि शहरी भागात किमान 2 हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे, जे आधी 1,500 रुपये होते. उर्वरित रक्कम ही 2,000 रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक मेट्रो आणि शहरी भागात 75 रुपये, निम -शहरी भागात 50 रुपये आणि ग्रामीण भागात दरमहा 20 रुपये आकारेल.

कार आणि दुचाकी खरेदी होईल स्वस्त: मोटार वाहन विमा बदलल्यास पुढील महिन्यापासून नवीन कार किंवा बाईकची किंमत थोडी स्वस्त होईल. याचा कोरोना कालावधीतील कोट्यावधी लोकांना फायदा होईल. इर्डा म्हणाले की, दीर्घकालीन पॅकेज पॉलिसीमुळे नवीन वाहन खरेदी करणे लोकांसाठी महागडे ठरते. तुम्हालाही जर नवीन गाडी किंवा मोटरसायकल खरेदी करायची असेल तर 1 ऑगस्टनंतर तुम्हाला वाहन विम्यावर कमी पैसे खर्च करावे लागतील. भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) मोटर थर्ड पार्टी आणि ओन डॅमेज इन्शुरन्स संबंधित नियमांमध्ये बदल करणार आहे. IRDAIच्या सूचनेनुसार, त्यानंतर नवीन कार खरेदीदारांना 3 आणि 5 वर्षे कारचा विमा घेण्यास भाग पाडले जाणार नाही.

ई-कॉमर्स कंपन्यांना प्रॉडक्टच्या कंट्री ऑफ ओरिजिनबद्दल माहिती द्यावी लागेलः 1 ऑगस्टपासून ई-कॉमर्स कंपन्यांकडून ते पुरवित असलेले प्रॉडक्ट कोठे तयार केले जाते हे सांगणे आवश्यक असेल. मात्र बर्‍याच कंपन्यांनी याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मिंत्रा, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलसह अनेक कंपन्यांचा समावेश आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड (डीपीआईआईटी) ने बुधवारी सांगितले की, सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या न्यू प्रॉडक्ट लिस्टिंग कंट्री ऑफ ओरिजन (country of origin) 1 ऑगस्टपर्यंत अपडेट करावा लागेल. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

LPG च्या किंमती बदलतील: दर महिन्याच्या पहिल्या तारखेला स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत बदल होतो. गेल्या दोन महिन्यांपासून LPG च्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये एलपीजीची किंमत वाढेल की कमी होईल, हे फक्त 1 तारखेलाच कळेल.

पंतप्रधान-किसान रक्कम 10 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येईल: गरीब आणि दुर्बल व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना निधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पाचवा हप्ता जमा केला आहे. आता 1 ऑगस्ट रोजी या योजनेंतर्गत मोदी सरकार 2000 रुपयांचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवणार आहे. पंतप्रधान किसान योजनेचा पाचवा हप्ता 1 एप्रिल 2020 रोजी जाहीर करण्यात आला. ही योजना सुरू झाल्यापासून सरकारने देशातील 9.85 कोटी शेतकर्‍यांना रोख रकमेचा लाभ दिला आहे.

RBL बँक बचत खात्याचे नियम बदलले: RBLने अलीकडेच आपल्या बचत खात्यातील व्याज दरात बदल केला आहे. नवीन दर हे 1 ऑगस्टपासून लागू होतील. आता तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यावर वर्षाकाठी 4.75 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर 1-10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के आणि 10 लाख ते 5 कोटी रुपयांच्या ठेवींवर 6.75 टक्के व्याज दिले जाईल. जर डेबिट कार्ड हरवले किंवा खराब झाले तर 200 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, आता आपल्याला टायटॅनियम डेबिट कार्डसाठी दरवर्षी 250 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर ग्राहक आता महिन्यातून 5 वेळा एटीएममधून पैसे काढू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com