आंतरराष्ट्रीय बाजारात सोने पुन्हा झाले स्वस्त, भारतीय सराफा बाजारातील नवीन दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 251 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 261 रुपयांची वाढ झाली आहे. तथापि, परदेशी बाजारात सोने खरेदी आज स्वस्त झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर खाली आल्या आहेत. जगातील बड्या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या बैठकीपूर्वी अमेरिकन डॉलरला वेग आला आहे. याचा परिणाम आज सोन्याच्या दरावर दिसून येतो.

आता पुढे काय होईल ?
जगातील सर्वात मोठी संशोधन संस्था जेफरीजच्या अहवालात असे सांगितले गेले आहे की, अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, जर सध्याच्या पातळीवरून डॉलर मजबूत झाला तर सोन्याच्या किंमती प्रति औंस 1900 च्या खाली येऊ शकतात. अशा स्थितीत सोन्यात वेगवान विक्री होण्याची शक्यता आहे.

आजचे सोन्याचे नवीन दर
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 शुद्धतेच्या सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 51,898 रुपयांवरून 52,149 रुपयांवर पोहोचल्या आहेत. या काळात प्रति दहा ग्रॅमच्या किंमती 251 रुपयांनी वाढल्या आहेत.

आजचे चांदीचे नवीन दर
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही वाढीस लागल्या आहेत. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत दहा ग्रॅम 68,950 रुपयांवरून वाढून 69,211 रुपये झाली. या काळात किंमतींमध्ये 261 रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment