आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने झाले महाग, आजची किंमत काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून आली. या आठवड्यात फेडरल रिझर्व बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तसेच डॉलरमध्येही थोडी कमजोरी दिसून येत आहे. अशा परिस्थितीत चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरलद्वारा घेण्यात येणाऱ्या उपायांवर गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. हेच कारण आहे की, सोमवारी अमेरिकेतील स्पॉट गोल्डची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढून 1,953.37 डॉलर झाली. मात्र, अमेरिकेच्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी वधारून ते 1,960.50 डॉलर प्रति औंस झाले.

अन्य चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये 0.1 टक्क्यांची कमजोरी दिसून येत आहे. हेच कारण आहे की, इतर देशांचे चलन असलेल्या गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे.

अमेरिकेत मदत पॅकेज जाहीर केल्याने किंमती वाढू शकतात
तथापि, फेड रिझर्व्ह कमिटीचे सदस्य आणि अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणांवरही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. तज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिकेला आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी जेरोम पॉवेल काय दृष्टिकोन बाळगतात यावर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. मात्र जर आताही आर्थिक प्रोत्साहन जाहीर केले तरी डॉलरमध्ये कमकुवत होण्याचे ते कारण असेल. गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी डॉलरचे कमकुवत होणे चांगले ठरेल.

कोरोना विषाणू या साथीच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील आणि मध्यवर्ती बँकांनी अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत पॅकेज जाहीर केले आहे. यंदा सोन्याच्या दरामध्ये जवळपास 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

भारतात सोन्या-चांदीची किंमत काय आहे?
दरम्यान, भारतातील सोन्याच्या बाबतीत गेल्या आठवड्यात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 207 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,672 रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर मागील आठवड्यात चांदीच्या दरातही प्रति किलो 251 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर नवीन किंमत 69,841 रुपयांवर पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment