Gold Price: तीन दिवसानंतर सोने झाले स्वस्त, आतापर्यंत दर प्रति दहा ग्रॅमच्या किंमतीत झाली 5374 रुपयांची घट

नवी दिल्ली । मंगळवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमती 3 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. याचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतो आहे. मंगळवारी कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर, डिसेंबरच्या सोने बाजारात आजच्या सुरुवातीच्या व्यापारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 0.55 टक्क्यांनी कमी होऊन 50,826 रुपयांवर आले होते. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा हा 1.2% ने घसरून 62,343 प्रती किलो झाला. मागील सत्रात सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूंमध्ये घसरणीची नोंद झाली . वरच्या स्तरापासून आतापर्यंत सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 5374 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या किंमती नरम झाल्या. परदेशी बाजारात स्पॉट सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1919.51 डॉलर प्रति औंस झाले. त्याच वेळी चांदीची किंमतही 0.4 टक्क्यांनी घसरुन 25 औंस डॉलर प्रति औंस झाली. सोन्याच्या किंमतींमध्ये फार मोठी घसरण झाली नाही कारण देश आणि जगात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे तसेच कोरोनाच्या लसीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट अशी अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली नाही आहे.

सोन्याचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 240 रुपयांनी महागले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,073 रुपये झाला. त्याचबरोबर शुक्रवारी दिवसाच्या व्यापारानंतर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,833 रुपयांवर बंद झाला.

चांदीचे नवीन दर
सोमवारी चांदीच्या किंमतीही वाढल्या. चांदीचा दर 786 रुपयांनी महाग झाला आणि तो प्रति किलो 64,927 रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी चांदी 64,141 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. अशा प्रकारे चांदीच्या दरात आज प्रति किलो 786 रुपयांची वाढ झाली आहे.

पुढे काय होईल?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यूएस उत्तेजन पॅकेजवरील अनिश्चितता अजूनही कायमच आहे. म्हणूनच व्यापारी आता ब्रिटनमधील व्यापार कराराकडे डोळे लावून आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ईयू व्यापार कराराची रूपरेषा तयार करण्यासाठी गुरुवारी अंतिम मुदत दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com