सोन्याच्या वायदा किंमती रेकॉर्ड स्तरावर; जाणुन घ्या आजचे भाव 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भारताच्या सोने बाजारातही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या कोरोनामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत.  सुरुवातीच्या व्यापारात भारतात सोन्याचे वायदा दर प्रति १० ग्रॅम ४८,८७१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. अशाप्रकारे २०२० मध्ये सोन्याच्या वायद्याच्या किंमतीमध्ये आतापर्यंत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये सोन्याच्या वायदा किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली होती.

सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे देशात सोन्याची किरकोळ मागणी कमी झाली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. बुलियन आयात करणाऱ्या बँकेशी संबंधित मुंबईतील एका बँकेच्या विक्रेत्याने सांगितले, “किरकोळ मागणी नगण्य आहे” किंमती कमी होण्याच्या आशेवर खरेदीदार सध्या त्यांच्या खरेदी योजना पुढे ढकलत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या आयातीमध्ये ९९ टक्क्यांची घट झालेली पाहायला मिळत आहे. संचारबंदीमुळे सराफा दुकाने तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याचा परिणाम आयातीवर झाला आहे.

बुधवारी आंतरराष्ट्रीय सोनेबाजारात सोन्याच्या दरात आठ वर्षाच्या उचचांकापर्यंत पोहोचले आहेत. अमेरिका आणि इतर देशांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे जागतिक स्तरावर आर्थिक  पुनर्प्राप्ती होण्याची शक्यता कमकुवत झाली आहे. आणि यामुळे गुंतवणूकदारांनी सेफ हेवन नावाच्या सोन्यात गुंतवणूक केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment