सोने 6000 रुपयांनी झाले स्वस्त, खरेदी करणे केव्हा फायदेशीर ठरेल हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेच्या आधारे आज शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे डिसेंबरच्या वायद्याचे दर हे 0.8 टक्क्यांनी वाढून 50,584 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर, चांदीच्या वायद्याचे दरही 1.8 टक्क्यांनी वाढून 61,605 रुपये प्रति किलो झाले आहे. पहिल्या सत्रात सोन्यात 142 रुपये तर चांदीमध्ये 0.17 टक्क्यांनी किंचित वाढ झाली.

ऑगस्टमध्ये दोन्ही धातूंचे दर पातळीवर स्तरावर होते
दोन्ही मौल्यवान धातूंचे दर यावर्षी ऑगस्टमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. ऑगस्टमध्ये प्रति 10 ग्रॅम सोनं हे 50,200 रुपयांवर तर चांदी 80,000 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती खाली आल्या आहेत. अशाप्रकारे, सोन्याच्या किंमतीत प्रति प्रति 10 ग्रॅम सुमारे 6000 रुपयांची घट झाली आहे.

कमकुवत डॉलरने सोन्याला केला सपोर्ट
कोरोना विषाणू या साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन मदत पॅकेज जाहीर केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे सेंटीमेंट सकारात्मक होते. अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, मदत पॅकेजसंदर्भात कॉंग्रेसशी चर्चा सुरू झाली आहे. कमकुवत झालेल्या डॉलरमुळे पिवळ्या धातूचा देखील फायदा झाला. सोन्याचे स्पॉट सुमारे 1,898 डॉलर प्रति औंस होते. डॉलर निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी घट झाली आहे. डॉलरची घसरण झाल्याचा हा सलग दुसर्‍या आठवडा आहे. चलनवाढीचा सामना करण्यासाठी सामान्यत: सोन्याला उपयुक्त मानले जाते.

सोन्याची खरेदी वाढू शकते
अमेरिकन डॉलरमधील सुरु असलेला चढ-उतार आणि इक्विटी बाजाराची दुर्दशा पाहिल्यास सोन्याच्या किंमतीतही चढ-उतार होताना दिसून येईल, असा कोटक सिक्युरिटीजचा विश्वास आहे. मात्र सर्वात कमी किंमतीत आम्ही सोन्याच्या खरेदीत वाढ पाहू शकतो. कमकुवत झालेल्या डॉलरच्या दरम्यान अमेरिकी अर्थव्यवस्थेविषयी अनिश्चितता कायम राहील.

मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी कमी केली
जगातील मध्यवर्ती बँकांनीही सोन्याची खरेदी कमी केली आहे. एका आकडेवारीनुसार, या केंद्रीय बँकांनी ऑगस्टमध्ये खरेदीपेक्षा जास्त सोने विकले. यापूर्वी मध्यवर्ती बँकांनी दीड वर्ष सलग सोनं विकत घेतलं. सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होण्यामागील हे देखील एक कारण आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment