दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ‘सुवर्ण संधी’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । दसऱ्याचा मुहूर्त साधल्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होणार आहे. दिवाळीच्या आधीच सोने खरेदी करणाऱ्यांना एक गोड बातमी मिळाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना सोने खरेदी करता येऊ शकणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात ३० रुपयांची किरकोळ घसरण झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

दिवाळीच्या सणांमध्ये सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्या चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यासाठी अनेक जण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करतात. सोन्याच्या दरात ३० रुपयांनी घसरण झाल्यामुळे सोन्याचा दर ३८,९५५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. यापूर्वी शनिवारी सोन्याचा दर ३८,९८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी कमी झाली आहे आणि त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी कमी झाली आहे. यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३८,९५५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे, अशी माहिती एका गुंतवणूक करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

Leave a Comment