सोन्याच्या किमतींनी केले नवे रेकॉर्ड, पुढील आठवड्यात ५० हजार वर पोहोचणार; जाणून घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी करणे आता महाग झाले आहे. राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत दहा ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 239 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर वाढत्या औद्योगिक मागणीमुळे देखील एक किलो चांदीच्या किंमती 845 रुपयांनी वधारल्या. गुरुवारी सोन्याच्या किंमती या 10 ग्रॅम प्रति 293 रुपयांनी घसरल्या. यानंतर 10 ग्रॅम सोन्याची नवीन किंमत 49,072 रुपयांच्या पातळीवर आली. बुधवारी पहिल्या दिवशी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 49,365 रुपये पातळीवर बंद झाली होती.

सोन्याचे नवीन दर
शुक्रवारी 99.9 टक्के सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 48819 रुपयांवरून वाढून 49,058 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1,764 डॉलर प्रति औंस झाली आहे.

पुढच्या आठवड्यात सोने 50 हजार असू शकते
बाजार तज्ज्ञांच्या मते, पुढील आठवड्यात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 50 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती या 80 हजारांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. कोरोनाची साथ जगभर पसरल्यामुळे, पडत्या अर्थव्यवस्थेचा सोन्याच्या बाजारावर प्रचंड परिणाम झाला आहे. या साथीच्या दरम्यान सोन्याच्या किंमती सतत वाढत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते सोन्याचे दर वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोना महामारी, भारत-चीन वाद आणि यूएस बँक फेडरल रिझर्व्ह बँकेने 2022 पर्यंत व्याज दर न वाढविण्याचा घेतलेला निर्णय हे आहे.

चांदीचे नवीन दर
सोन्याप्रमाणेच चांदीच्याही किंमती सध्या वाढलेल्या आहेत. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत ही 48,455 रुपयांवरून 49,300 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर हे प्रति औंस 17.81 डॉलरवर पोहोचले आहेत.

सोने-चांदी का महाग झाले ?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम 239 रुपयांची वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment