Gold Price: सोन्याचे दर 133 रुपयांनी तर चांदीचे दर 875 रुपयांनी गसरले, नवीन दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण हाळी आहे. जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये परत आलेल्या खरेदीमुळे सोन्याच्या किंमती देशांतर्गत बाजारातही घसरल्या आहेत. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52 हजार रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत 875 रुपयांनी खाली आली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, दिवाळीपर्यंत सोने एका रेंचमध्ये राहील. जर आपण वरच्या स्तराबद्दल बोललो तर ते प्रति दहा ग्रॅम 51,500 ते 52800 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. त्याच वेळी, त्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 49,800 पर्यंत घसरण्याची शक्यता देखील आहे.

सोन्याचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या किंमतीत 133 रुपयांची घसरण झाली आहे. दिल्लीतील नवीन किंमत आता प्रति दहा ग्रॅम 51,989 रुपये आहे. त्याचबरोबर सोमवारी आदल्या दिवशी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 52,122 रुपयांवर बंद झाला होता.

एमएक्सएक्सवर 5374 रुपये स्वस्त झाले सोने
आजच्या सुरुवातीच्या व्यापारात, डिसेंबरच्या वितरणासाठीच्या सोन्याचे दर 0.55 टक्क्यांनी घसरून 50,826 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा 1.2% ने घसरून 62,343 प्रती किलो झाला. मागील सत्रात सोन्या-चांदीच्या दोन्ही धातूंची घसरण नोंदली गेली. वरच्या स्तरापासून आतापर्यंत सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 5374 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

चांदीचे नवीन दर
मंगळवारी चांदीचे दरही घसरले आणि चांदी 875 रुपयांनी स्वस्त झाली आणि 63,860 रुपये प्रतिकिलोवर आली. तर, चांदीचा भाव सोमवारी 64,735 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. अशा प्रकारे चांदीचा दर आज प्रति किलो 875 रुपयांनी खाली आला आहे.

पुढे काय होईल?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्यापाऱ्यांची नजर आता अमेरिकेच्या मदत पॅकेजवर आहे. परंतु अजूनही त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. म्हणूनच व्यापारी आता ब्रिटनमधील व्यापार कराराकडे डोळे लावून आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ईयू व्यापार कराराची रूपरेषा तयार करण्यासाठी गुरुवारी अंतिम मुदत दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment