शाळा व महाविद्यालये बंद पडल्यामुळे सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देत आहे, या दाव्याचे सत्य जाणून घ्या?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण ही जाहिरात पाहिली असेल किंवा वाचली असेल कि कोरोनाव्हायरसमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.त्यामुळे सरकार सगळ्या विद्यार्थ्यांना एंड्रॉइड स्मार्टफोन (Free Android Smartphone) देणार आहे. तर या जाहिराती मागची सत्यता जाणून घ्या. कारण ही बातमी दिशाभूल करणार्‍या जाहिरातीशिवाय आणखी काही नाही.

#PIBfactcheck ने ही जाहिरात बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत अँड्रॉइड स्मार्टफोन देण्यात यावा.

1 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार नाहीत
सरकारने अनलॉक 4 साठीच्या मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत आणि असे म्हटले आहे की, शाळा आत्तासाठी बंद ठेवल्या पाहिजेत. यामुळे 1 सप्टेंबरपासून शाळा सुरू होण्याची शक्यता आता संपुष्टात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment