कोरोनाच्या या संकटात उद्योजकांसाठी मोठी बातमी – GST संदर्भात सरकारने ‘हा’ घेतला निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारने कंपोजीशन योजनेंतर्गत सरकारने व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत त्यांनी दोन महिन्यांपर्यंत वाढविली आहे. आता ती 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी वेळ आहे की, जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली. यापूर्वी हा रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 15 जुलै होती. आता ती 31 ऑक्टोबर करण्यात आली.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, वित्त वर्ष 2019-20 चा जीएसटीआर 4 भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

वस्तू व सेवा कर अंतर्गत (जीएसटी) वार्षिक 1.5 टक्क्यांपर्यंतची उलाढाल असलेला कोणताही करदाता कंपोजीशन योजना स्वीकारू शकतो. या योजनेतील उत्पादक आणि व्यापाऱ्यांना एक टक्का दराने जीएसटी भरावा लागेल. तर नॉन-अल्कोहोलिक रेस्टॉरंट्सला पाच टक्के दराने जीएसटी भरावा लागतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment