सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की सरकार हेलिकॉप्टरने पैसे पडणार आहेत.पीआयबीने सोशल मीडियावरील या दाव्याची वस्तुस्थिती तपासली.एका टीव्ही शोफुटेजच्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सरकार हेलिकॉप्टरद्वारे पैसे खाली पाडेल, असा खोटा प्रचार केला जात आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक विंगने म्हटले आहे की सोशल मीडियावर हा जो दावा केला जात आहे तो खोटा आहे आणि सरकार असे काहीही करणार नाहीयेत.

वास्तविक, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव म्हणाले होते की, हेलिकॉप्टर मनीच्या वापरामुळे राज्यांना सध्याचे संकट दूर करण्यात मदत होईल. राव यांनी मागणी केली की जीडीपीच्या ५ टक्के हिस्सा कमी प्रमाणात द्यावेत. क्वांटिटेटिव इझिंग हे असे धोरण आहे ज्याचे जगभरातील अर्थव्यवस्था अनुसरण करतात.अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग मानला जातो.

CSIR develops advanced security ink to stop counterfeiting of ...

राव म्हणाले, ‘आर्थिक पेचप्रसंगावर मात करण्यासाठी एका चांगल्या आर्थिक धोरणाची गरज आहे. आरबीआयने क्वांटिटेटिव इजिंग पॉलिसी लागू केली पाहिजे.याला हेलिकॉप्टर मनी म्हंटले जाते.यामुळे राज्ये आणि वित्तीय संस्थांना पुरेसा निधी उपलब्ध होईल आणि या संकटातून मुक्तता होईल.

त्यानंतर हेलिकॉप्टरमधून सरकार पैसे खाली पाडतील अशा अफवा पसरु लागल्या. आर्थिक परिस्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारकडून हेलिकॉप्टर मनी देण्यात येईल.याचा अर्थ असा आहे की हेलिकॉप्टर मनीच्या व्यवस्थेखाली केंद्रीय बँक सरकारला अशी रक्कम देते, ज्याची परतफेड करण्याची गरज नसते. याद्वारे, सामान्य लोकांच्या हाती अधिक पैसे पोहोचविले जाते जेणेकरून त्यांचा खर्च वाढू शकेल आणि यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

The case for helicopter money | Financial Times

हेलिकॉप्टर मनी हे आर्थिक धोरणांचे एक अपारंपरिक साधन आहे, ज्याद्वारे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणली जाते. या अंतर्गत पैसे मोठ्या प्रमाणात छापले जातात आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जातात. हा शब्द प्रथम अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्राइडमॅनने वापरला होता.

फ्रीडमॅन म्हणाले होते की अर्थव्यवस्थेत अचानक पैशांची वाढ झाल्याने आलेली सुस्ती दूर होईल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीस वेग येईल.अशा पॉलिसीअंतर्गत,केंद्रीय बँक सरकारमार्फत पैशाचा पुरवठा वाढवते आणि लोकांना नवीन रोख हस्तांतरित करते. यामुळे उत्पादनांची मागणी वाढते आणि महागाईही वाढते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण

खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment