आपल्या सर्व छोट्या बचत योजनांबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता त्यांवर किती व्याज मिळेल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकारने बुधवारी आपल्या स्मॉल सेविंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) वरील व्याज दारात बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि NSC सह इतर अनेक बचत योजना सामील आहेत. सरकारच्या या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता या योजनांच्या व्याज दरामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये कोणताही बदल होणार नाही. अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभाग सचिव तरुण बजाज यांनी याबाबत माहिती दिली. चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात कर्ज घेण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे सांगताना त्यांनी ही माहिती दिली.

हे व्याज दर प्रत्येकी तीन महिन्यांनी सुधारित केले जातात
अर्थ मंत्रालय दर तीन महिन्यांनी आपल्या छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात बदल करते. यासंबंधीची एक अधिसूचना जारी करून याबाबतची माहिती दिली जाते. सलग तिसऱ्या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आहे.

वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे
यानंतर, वित्त मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली होती, ज्यात आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसर्‍या तिमाहीत छोट्या बचत योजनांच्या व्याज दराविषयी माहिती होती. या अधिसूचनेत असे सांगितले गेले होते की, 31 डिसेंबरपर्यंत या योजनांच्या व्याजदरामध्ये कोणताही बदल होणार नाही.

> यानुसार 5 वर्षांसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला 7.4 टक्के दराने व्याज मिळेल. या योजनेवरील व्याज दर तिमाही आधारावर दिले जातात.
सेविंग्स डिपॉजिटवरील व्याज दर वार्षिक 4% असेल.

> सुकन्या समृद्धि योजना (SSY) ला 7.6 टक्के दराने व्याज मिळणार आहे. 7.6 टक्के दराने हे व्याज चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत असेल.

> किसान विकास पत्र (KVP) वर 6.9 टक्के दराने व्याज दिले जाईल.

> 1 ते 5 वर्षांच्या टर्म डिपॉजिटवर व्याज दर 5.5-6.7 टक्के राहील. हे तिमाही आधारावर दिले जाते.

> त्याशिवाय 5 वर्षाच्या रिकरिंग डिपॉजिटवर 8.8 टक्के दराने व्याज दिले जाईल.

> नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटवर 6.8% व्याज मिळेल.

> त्याच वेळी, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला (PPF) तिसर्‍या तिमाहीत 7.1 टक्के दराने व्याज मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment