जुलैमध्ये GST Colllection घटून 87,422 कोटी रुपयांवर आला, वित्त मंत्रालयाने सांगितले ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यात एकूण जीएसटी संग्रहण 87,422 कोटी रुपये झाले असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने शनिवारी दिली. त्यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) म्हणून 16,147 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) म्हणून 21,418 कोटी रुपये आणि आयजीएसटी म्हणून 42,592 कोटी रुपये जमा आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की आयजीएसटीपैकी 20,324 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीद्वारे तर 7,265 कोटी रुपये सेसद्वारे जमा झाले आहेत

जून 2020 च्या तुलनेत गेल्या महिन्यात जूनमध्ये जीएसटी संकलनात घट झाली आहे. जूनमध्ये केंद्र सरकारने 90,917 कोटी रुपयांचा जीएसटी जमा केला. मागील वर्षाच्या तुलनेत जुलै 2019 मध्ये एकूण जीएसटी कलेक्शन 1.02 लाख कोटी रुपये होते.

रेग्युलर सेटलमेंटनंतर केंद्र व राज्य सरकारला किती जीएसटी प्राप्त झाला आहे?
IGST च्या नियामक सेटलमेंटपैकी सरकारने 23,320 कोटी रुपये सीजीएसटी आणि 18,838 कोटी रुपये आयजीएसटी निश्चित केले आहेत. जुलैमध्ये केंद्र व राज्य सरकारला जीएसटीचा एकूण महसूल अनुक्रमे 39,467 कोटी रुपये आणि 40,256 कोटी रुपये झाला.

मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत गेल्या महिन्यात जीएसटी महसूल पाहिला तर ते 86 टक्के आहे. त्याचप्रमाणे वस्तू आयातातून जीएसटी 84% आणि देशांतर्गत व्यवहारातून 96%% महसूल मिळतो. वित्त मंत्रालयानेही याबाबत माहिती दिली आहे.

जुलैची आकडेवारी जूनच्या तुलनेत कमी का होती?
जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “जीएसटी महसूल जुलैच्या तुलनेत जूनमध्ये जास्त होता. मात्र , हे लक्षात घेण्यासारखे आहे की मागील महिन्यात करदात्यांनी मोठ्या प्रमाणात कर जमा केला होता. कोविड -१९ च्या दृष्टिकोनातून दिलासा दिल्यानंतर हे काम फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 2020 मध्ये करण्यात आले. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की 5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या करदात्यांना सप्टेंबर 2020 पर्यंत रिटर्न भरण्याचा फायदा मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment