औरंगाबादमध्ये थकीत कर वसुलीसाठी जीएसटी कार्यालयाची यंत्रणा लागली कामाला,५० कोटी वसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । जीएसटी विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविली होती. ही योजना दोन टप्प्यांत राबविण्यात आली होती. या योजनेतून २ टप्प्यात केलेल्या करवसुलीत ५० कोटींचा कर वसूल झाला आहे. २०१० पासून थकीत करदात्यांकडून ही वसुली करण्यात जीएसटी कार्यालयास यश मिळाले आहे. यासाठी औरंगाबाद जीएसटी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती तेव्हा ही वसुली करण्यात आली.

जीएसटी लागू झाल्यानंतर एक देश – एक करप्रणाली झाली. इतर सर्व कर रद्द होऊन वस्तू व सेवाकर देशभरात लागू झाला. या कराच्या माध्यमातून सर्व व्यवहार पारदर्शकपणे करण्यात येत आहेत. अभय योजनेंतर्गत नोंदीत व अनोंदीत व्यापाऱ्यांकरिता बीएसटी, व्हॅट, सीएसटी, पीटी आदी ११ कायद्यांतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात लाभ देण्यात आले.

राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतून करसंकलनाचे काम करण्यात येते. या तीनही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांकडे २०१० पासून थकीत कर होता. तो वसुलीसाठी जीएसटीच्या मुख्य कार्यालयातर्फे अभय योजना राबविण्यात आली. कर, व्याज शास्ती आणि विलंब शुल्क तडजोड देत थकीत कर भरण्याची सुविधा व्यापाऱ्यांना दिली होती. या योजनेची औरंगाबादच्या कार्यालयातील सर्वच अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. त्यामुळे अभय योजनेच्या माध्यमातून ३ हजार ८९५ व्यापाऱ्यांपर्यंत पोचण्यात जीएसटीला यश आले.

Leave a Comment