HDFC बँकेची नवी योजना! ग्राहकांना १० सेकंदात मिळतेय गाडी, बाईक, स्कूटीसाठी कर्ज; जाणुन घ्या प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी बँकेने आपल्या डिजिटल वाहन कर्जाच्या ऑफरचा विस्तार जवळपास 1,000 शहरांमध्ये वाढविण्याची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत वाहन कर्ज अवघ्या 10 सेकंदात दिले जाते. एचडीएफसी बँकेने गुरुवारी याची घोषणा केली. बँकेची ही घोषणा महत्त्वपूर्ण आहे कारण कोविड -१९ संक्रमणामुळे वाहन-उद्योगातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोरोनाचे संक्रमण कमी असलेल्या आणि महानगर-नसलेल्या भागात सध्या वाहन विक्री वाढलेली आहे.

या राज्यांमध्ये झाली सुरुवात
वाहन उद्योगाशी संबंधित लोकांचा असा विश्वास आहे की या साथीचा अर्थव्यवस्थेवर तीव्र परिणाम झालेला आहे. सोशल डिस्टंसिंग सारख्या निर्बंधांमुळे लोकं आता सार्वजनिक वाहतुकीऐवजी खासगी वाहने वापरण्यास प्राधान्य देतील. यामुळे वाहनांची मागणी वाढेल. एचडीएफसी बँकेचे हे नवे लोन प्रॉडक्ट आता जिपड्राइव त्वरित वाहन लोन देशभरातील 1,000 शहरांमधील ग्राहकांना उपलब्ध असेल. या शहरांमध्ये आंध्र प्रदेशातील भीमावरम, उत्तर प्रदेशमधील हरदोई, केरळमधील थॅलेसेरी आणि ओडिशामधील बालासोर यांचा समावेश आहे.

आता एका क्लिकवर मिळेल लोन
एचडीएफसी बँकेचे असे म्हणणे आहे की, ते सर्वात जलद रीतीने मंजूरी मिळणारे ऑनलाइन वाहन लोन आहे. बँक हे लोन ‘प्री-एप्रूव्ड’ ऑफरद्वारे ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. एचडीएफसी बँकेचे रिटेल लोन व्यवसायाचे प्रमुख अरविंद कपिल म्हणाले की, लॉकडाऊननंतर डिजिटल प्लॅटफॉर्मची भूमिका अधिक महत्त्वपूर्ण होईल. ते म्हणाले की, ‘हे प्रॉडक्ट कॉन्टॅक्टलेस लोन सुविधा असल्याने सर्वांसाठी अगदी सोयीचे आहे.’ ते म्हणाले की,’ आता बँक दुसर्‍या आणि तिसर्‍या श्रेणीतील ग्राहकांशी एका बटणाच्या क्लिकवर कनेक्ट होऊ शकेल.’ बँकेने असे म्हटले आहे की, हे प्री-एप्रूव्ड लोन ग्राहकांना विश्लेषण आणि कोड भाषा कोड (अल्गोरिदम) च्या माध्यमातून देण्यात येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment