कॉर्पोरेट कंपन्यांच्या देणग्यांनी भाजप मालामाल; इतर राजकीय पक्षांपेक्षा मिळाली ७ पटींनी अधिक देणगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या ७ वर्षांच्या कालावधीत कॉर्पोरेट कंपन्यांकडून सर्वाधिक देणगी भारतीय जनता पक्षाला मिळाला असल्याचे असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) एका ताज्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. इतर पक्षांना मिळालेल्या देणगीची बेरीज केली, तरी देखील भारतीय जनता पक्षाला मिळालेला निधी हा ७ पटीने अधिक असल्याचे ADRच्या अहवालात समोर आलं आहे. सन २०१८ ते २०१९ मध्ये भाजपला ६९८ कोटी रुपयांची देणगी मिळाली, तर काँग्रेस पक्षाला केवळ १२२.५ कोटी रुपयांची देणगी मिळू शकली. सन २००४-१२ दरम्यान कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळालेल्या देणग्या पाहिल्यास सन २०१८-१९ मध्ये त्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपवर देणग्यांचा पाऊस

देणग्यांचा पाऊस, भाजपची भरली तिजोरी
सन २०१२-१३ पासून २०१८-१९ या कालावधीत भारतीय जनता पक्षाला कॉर्पोरेट कंपन्यांकडून सर्वात अधिक देणग्या मिळाल्या. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या देणग्यांमध्ये इतर स्त्रोतांकडून आलेला पैसा हा केवळ ४४ कोटी रुपये इतकाच आहे. २०१८-१९ मध्ये उर्वरित राष्ट्रीय पक्षांना (काँग्रेस, एनसीपी, तृणमूल काँग्रेस आणि सीपीएम) मिळालेल्या देणग्यांची बेरीज केली असता त्या रकमेहून ७ पट अधिक रक्कम भारतीय जनता पक्षाला मिळाली आहे.

राजकीय पक्षांना टाटाने दिली सर्वाधिक देणगी

टाटाने राजकीय पक्षांना दिल्या ४५५ कोटी रुपयांच्या देणग्या
सन २०१८-१९ दरम्यान राजकीय पक्षांना देणगी देण्यात टाटा समूहाचा प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट सर्वात पुढे आहे. टाटाच्या प्रोग्रेसिव्ह ट्रस्टने २०१८-१९ दरम्यान एकूण ४५५ कोटी १५ लाख रुपयांच्या देणग्या राजकीय पक्षांना दिल्या. कॉर्पोरेट देणगीदारांच्या यादीत टाटा सर्वात वरच्या स्थानी आहे.

निवडणूक आयोगाला देणग्यांची माहिती देणे बंधनकारक

निवडणूक आयोगाला देणग्यांची माहिती द्यावी लागते
राजकीय पक्षांना २० हजार रुपयांहून अधिक देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. यात दात्याचे नाव, पत्ता, PAN, पेमेंट टाइप आणि रकमेचा तपशील द्यावा लागतो. २७४ कॉर्पोरेट देणगीदारांकडून राजकीय पक्षांनी १३.३६४ कोटी रुपये पॅनविना आणि पत्त्याविनाच प्राप्त केल्याचे ADR चे म्हणणे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment