येथे FD केल्यावर ज्येष्ठ नागरिकांना मिळते 50000 रुपयांपर्यंत करात सूट, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण, तज्ञांचे असे म्हणणे आहे की आयकर कलम 80TTB अंतर्गत बँक, पोस्टऑफिस किंवा सहकारी बँकेत 50,000 पर्यंत व्याज उत्पन्न हे आर्थिक वर्षात करमुक्त आहे. आयकर कलम 80TTB हे 2018 च्या अर्थसंकल्पात लाँच करण्यात आले होते. या आयकर कलम 80TTB अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावरील करामध्ये सूट मिळते. ही सूट बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँकेच्या एफडीवर उपलब्ध आहे. मात्र, आपण कॉर्पोरेट एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास ही सूट उपलब्ध मिळणार नाही. कॉर्पोरेट एफडीवरील व्याज दर सामान्यत: बँक एफडीपेक्षा जास्त असतात.

हे जाणून घेणे महत्वाचे आहे

1. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे लोक.

2. ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात 50,000 रुपयांपर्यंत व्याज जमा असल्यास बँका त्यावर टीडीएस कमी करू शकत नाहीत. आयकर कलम 194A अंतर्गत ज्येष्ठ नागरिकास ही सूट मिळते.

3. आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सूट आहे.

4. जर ठेवीवरील व्याजाची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर ज्येष्ठ नागरिकांच्या कराच्या स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जाईल.

5. ही कर सूट बॉण्ड्स, एनसीडी किंवा कंपनी एफडीच्या व्याजदरावर मिळणार नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : http://www.hellomaharashtra.in

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook