आपला स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना आता ITR मध्ये द्यावी लागणार ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इनकम टॅक्स विभागाने सूचना दिली आहे की AY 2020-21 साठी आयटीआर फॉर्म 3 हा e ई-फाईलिंगसाठी उपलब्ध आहे. ते एक्सेल किंवा जावामध्ये डाउनलोड करता येतील. आयटीआर फॉर्म 3 हा व्यावसायिकांसाठी असल्याचे टॅक्स एक्सपर्टचे म्हणणे आहे. यावेळी फॉर्ममध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2020 ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे.

कोणासाठी आहे आयटीआर फॉर्म 3- जे आपला स्वतःचा व्यवसाय करतात आणि व्यावसायिक लोक आहेत त्यांना आयटीआर फॉर्म -3 भरावा लागेल.

यावेळी तुम्हाला ही महत्वाची माहिती द्यावी लागेल – टॅक्स एक्सपर्ट गौरी चड्ढा यांनी न्यूज 18 हिंदीला सांगितले की, जर करदात्याने एका वर्षामध्ये 1 लाखाहून अधिक वीज बिल (Electricity Bill) भरले असेल तर त्याला ते आयटीआर फॉर्म -4 मध्ये द्यावा लागेल. या व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीने एका वर्षात परदेश सहलीवर (Foreign Trip) 2 लाखाहून अधिक रुपये खर्च केले असतील तर त्याचा संपूर्ण तपशीलदेखील द्यावा लागेल. तसेच चालू खात्यात 1 कोटींहून अधिक रोखीची रक्कम असल्यास त्याची माहितीही या फॉर्ममध्ये भरावी लागेल. गौरी म्हणतात की सेक्शन 139(1) मध्ये जर कोणी भरण्यास पात्र नसेल आणि त्याने तिन्ही गोष्टींमध्ये व्यवहार केला असेल तरच फक्त ही माहिती द्यावी लागेल.

गौरी नमूद करतात की, या नवीन आयटीआर फॉर्म -3 मध्ये 1 एप्रिल ते 31 जुलै 2020 पर्यंत केलेल्या गुंतवणूकीची माहिती मागितली गेली आहे. हे शेड्यूल Delayed Investment किंवा शेड्यूल DIमध्ये दर्शविले जावे. यामध्ये करदात्यास 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान टॅक्सच्या बचतीशी संबंधित गुंतवणूकीचा तपशील द्यावा लागेल. याअंतर्गत, करदात्यास 1 एप्रिल 2020 ते 31 जुलै 2020 या कालावधीत टॅक्स सेविंग इंस्ट्रूमेंट्स किंवा 2019-20 या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या डोनेशनबद्दलची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. खरं तर, कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन लक्षात घेता सरकारने 31 जुलैपर्यंत कर बचत योजनेत गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे.

आयटीआर -3 फॉर्म या लिंकद्वारे डाऊनलोड करता येईल. https://www.incometaxindiaefiling.gov.in/eFiling/Portal/StaticPDF/ITR_Notified_ Forms/AY_2020-21/ITR-3_Notified_Form.pdf

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com