जाणून घ्या, तिकिटांची विक्री करुन रेल्वे किती पैसे कमवते? आरटीआयमधून समोर आली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । प्रवासी तिकिटे विकून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 400 कोटींची घट झाली आहे. तर, याच काळात मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात 2800 कोटींची वाढ झाली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.

मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्यातील माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी रेल्वे मंत्रालयाकडे रेल्वेच्या उत्पन्नाविषयी माहिती मागितली होती. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, एप्रिल ते जून या तिमाहीत रेल्वेला 13,398.92 कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाले. त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 13,243.81 कोटी रुपये महसुली उत्पन्न मिळाले. यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत उत्पन्नात घट होऊन 12844.37 कोटी रुपये रेल्वेला मिळाले.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीत 29,066.92 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर, दुसऱ्या तिमाहीत यात 25,165.13 कोटी रुपयांची घसरण झाली. यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत 28,032.80 कोटी रुपये उत्पन्न झाले नुकतच रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी मालवाहतुकीचे भाडे कमी करण्याचे संकेत दिले आहेत. व्ही.के. यादव यांच्या म्हणण्यानुसार मालवाहतुकीच्या भाड्यात कपात केली जाऊ शकते.

रेल्वेच्या ताज्या अहवालानुसार नेट रेवेन्यू सरप्लस 66.66 % ने कमी झाला आहे. 2016-17 मध्ये ही घसरण 4913 कोटी रुपये झाली आहे तर 2017-18 मध्ये 1665.61 कोटी रुपये झाली आहे. रेल्वेच्या कमाईतही 3% घट झाली आहे, ज्यामुळे त्याचे एकूण अर्थसंकल्पीय आधारावर अवलंबून राहिले. कॅगच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे ऑपरेटिंग गुणोत्तर 98.44 इतका आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

मोठी बातमी : हेरातहून दिल्लीकडे येणारे विमान अफगाणिस्तानात कोसळले; विमानात 110 प्रवासी

खुशखबर : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारची नवीन योजना, दहा हजार कोटी रुपये खर्च करणार !

CAA, NRC लागू होणं हा जिनांचा विजय- शशी थरुर

 

Leave a Comment