इन्फोसिसचे काही मिनिटात बुडाले ४५ हजार कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसच्या मॅनजमेंटवर सोमवारी गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळपर्यंत कंपनीच्या शेअर्स १४ टक्क्यांपेक्षा अधिक पडल्याचं पहायला मिळालं. यामुळे गुंतवणुकदारांचं अवघ्या काही मिनिटांमध्ये तब्बल ४५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झालं. शुक्रवारी इन्फोसिसचा शेअर ७६७.७५ रुपयांवर बंद झाला होता. तसंच कंपनीचं मार्केट कॅपही जवळपास ३ लाख ३० हजार ७३ कोटी रूपये होते. मंगळवारी कंपनीचे शेअर्स १६ टक्क्यांनी पडले असून ते ६४५.३५ रूपयांव पोहोचलं. त्यानंतर कंपनीची मार्केट कॅपही कमी होऊन ती २ लाख ७७ हजार ४५० कोटी रूपयांवर पोहोचली. दरम्यान, यामुळे गुंतवणुकदारांना तब्बल ५२ हजार कोटी रूपयांचं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं.

गेल्याच आठवड्यात तिमाही वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या कंपनीच्या ताळेबंदात नफ्याची आकडेवारी फुगविण्यात आली असल्याचा आरोप इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाला उद्देशून लिहिलेल्या चार पानी पत्रात संबंधित कर्मचाऱ्याने आपले नाव जाहीर न करता आर्थिक ताळेबंदाच्या गैर व्यवहाराचा आरोप केला आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गेल्या तिमाहीचा सादर केलेला ताळेबंद चुकीचा असून त्यातील नफ्याची आकडेवारी ही खोटी असल्याचा दावा या कर्मचाऱ्याने याबाबतच्या पत्रात केला आहे.

Leave a Comment