एअर इंडिया विकावीच लागेल; केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली ।  आधीच कर्जाच्या ओझ्या खाली असलेली आणि सध्या कोरोनामुळे आणखी अचडणीत आलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया विकावीच लागेल असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले. गेल्या काही काळापासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एअर इंडियाचे खासगीकरण गरजेचे असून सरकार त्या दिशेने काम करत असल्याचे हरदीप सिंह पुरी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

आर्थिक संकटामुळं एअर इंडिया कर्मचाऱ्यांना विना पगार सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय सरकार नाइलाजाने हा घेत आहे. सध्या सरकार अशा परिस्थितीत नाही की विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांना मोठी आर्थिक मदत करू शकेल असे, पुरी म्हणाले. दरम्यान, एअर इंडियाकडे १३ हजारहून अधिक कर्मचारी आहेत. ज्यांच्या पगारावर महिन्याला २३० कोटी इतका खर्च होतो. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींमुळे एअर इंडियाला वेळेवर पगार देता आला नाही. याआधी कोरोना संकटामुळे एअर इंडियाने मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पगारात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे एअर इंडियाला मोठे नुकसान होत आहे. याबाबत माहिती देताना एअर इंडियाचे सीएमडी राजीव बन्सल यांनी सांगितले की, ”खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा देखील समावेश आहे. काही कर्मचाऱ्यांना निवृत्ती घेण्यास सांगितले जाऊ शकते.”

एअर इंडिया कर्मचाऱ्यांना विना पगार सुट्टीवर पाठवण्याचा सरकारचा निर्णयकालच आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना ५ वर्षासाठी लिव्ह विद आउट पे (Leave Withouth Pay) म्हणजेच विना पगार सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार एअर इंडियातील कर्मचाऱ्यांना सहा महिने, दोन वर्ष अथवा ५ वर्ष विना पगार सुट्टीवर पाठवले जाऊ शकते.कर्मचाऱ्यांची कामाची क्षमता, मागील सुट्ट्यांचे रेकॉर्ड, कामातील सातत्य आणि कामाचे मुल्य आदी गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य कार्यालय आणि स्थानिक कार्यालयातील प्रमुख प्रत्येक कर्मचाऱ्यांचे मुल्यांकन करतील. १५ ऑगस्टपर्यंत अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाणार आहे, ज्यांना विना पगार सुट्टीवर पाठवायचे आहे. ज्या कर्मचाऱ्यांना विना पगार सुट्टीवर पाठवले जाणार आहे त्यांना एअर इंडियाच्या परवानगीशिवाय अन्य कोणत्याही विमान सेवा कंपनीत काम करता येणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना विना पगार सुट्टीवर पाठवले जाणार आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा आणि पास आदी सुविधा कंपनी देणार आहे.

Leave a Comment