IRCTC ने ट्रेनमध्ये 15 रुपयांची पाण्याची बाटली विकून कमावले 3.25 कोटी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे IRCTC चे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल ते मे आणि जून या तिमाहीत कंपनीला 24.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 2019 मध्ये कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीत 72.33 ​​कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्चपासून रेल्वे सेवेवरील निर्बंध हळूहळू हटविले जात आहेत, तरीही बहुतेक सामान्य प्रवासी सेवांवर अद्यापही बंदी आहे. मार्चच्या तिमाहीत मालगाड़ी आणि विशेष ट्रेन वगळता सर्व प्रवासी सेवा बंद करण्यात आल्या. IRCTC ही भारतीय रेल्वेचे केटरिंग, पर्यटन आणि तिकिटाचे काम पाहते, तर कंपनी इतर पर्यटन सेवांशी देखील जोडलेली आहे. चला जाणून घेऊया IRCTC च्या उत्पन्नाबद्दल …

जूनच्या तिमाहीत IRCTC चा महसूल 71 टक्क्यांनी घसरून 131.33 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत IRCTC ने 459 कोटींची कमाई केली होती. या तिमाहीत कंपनीच्या सर्व विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे. मात्र, पर्यटन क्षेत्रात सर्वात मोठी घसरण नोंदली गेली. पर्यटन विभागाचे उत्पन्न हे गेल्या वर्षीच्या 47.62 कोटी रुपयांवरून 2.95 कोटी रुपयांवर आले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत केटरिंगमधून मिळालेले उत्पन्न 272 कोटी रुपयांवरुन 90 कोटींवर आले आहे. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून तिकिटांचे बुकिंग 82 कोटी रुपयांवरून 35.22 कोटींवर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल नीरचे उत्पन्न 57 कोटी रुपयांवरून घसरून 3.25 कोटी रुपयांवर आले. मात्र, या कालावधीत कंपनीच्या इतर उत्पन्नात वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अन्य उत्पन्न 17 कोटी रुपयांवरून 25 कोटी रुपयांवर गेले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment