भारताच्या ‘या’ कंपनीने दिली आहे Permanent Work From Home ची सुविधा, आता 75% कर्मचारी करणार घरातूनच काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळात अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याची सुविधा दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जिथे गुगल आणि फेसबुकने पुढील वर्षी जूनपर्यंत त्यांच्या कर्मचार्‍यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर भारताची कंपनी आरपीजी एंटरप्राइजेजने (RPG Enterprise) ने याबाबत त्यांनाही मागे टाकले आहे. कंपनीने आपल्या सेल्स कर्मचार्‍यांना पर्मनंटली वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली आहे. असे करणारी ही भारतातील पहिली कंपनी आहे.

75% कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरपीजी एंटरप्रायजेस टायर, आईटी, हेल्थ, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लांटेशन क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनीने वर्क फ्रॉम होम विषयी आपले एक नवीन धोरण तयार केले आहे. याअंतर्गत कंपनीचे कर्मचारी कायमचे घरातूनच काम करतील, तर इतर कर्मचार्‍यांपैकी 50 टक्के लोकांनाही घरूनच काम करण्याची मुभा दिली जाईल. विशेष प्रकरणात कार्यालयात काम करणाऱ्या 75 टक्के कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

नवीन धोरण 1 सप्टेंबरपासून अंमलात येईल
कार्यालयात काम करणारे कर्मचारी महिन्यातून दोन आठवडे घरातून काम करू शकतात आणि विशेष प्रकरणांमध्ये त्यांना तीन आठवड्यांसाठी घरूनच काम करण्याची परवानगी मिळू शकते. सध्या कार्यालयात काम करणार्‍या कंपनीचे सर्व कर्मचारी घरूनच काम करत आहेत आणि या ग्रुप ने त्यांची सर्व कार्यालयेही बंद केली आहेत. कंपनीचे नवीन धोरण 1 सप्टेंबरपासून अंमलात येईल. हे धोरण आरपीजीच्या ग्लोबल ऑपरेशनंसना देखील लागू होईल. तसेच कारखान्यात आणि प्लांटेशंस मशीनवर काम न करणाऱ्या कामगारांनाही हे धोरण लागू असेल.

WFM क्वालिटी ऑफ लाइफ सुधारेल आणि प्रोडक्टिविटी वाढवेल
आरपीजी एंटरप्रायजेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, वर्क फ्रॉम होम पॉलिसीने आपली काम करण्याची पारंपारिक पद्धत मोडली आहे. जे कर्मचारी मशीनवर काम करत नाहीत आणि जे तंत्रज्ञान व्यवसायात ग्राहकांना भेटण्यास जबाबदार नाहीत, ते कोरोना कालावधीनंतरही कोठूनही काम करू शकतात. आरपीजी एंटरप्राइजेजने जगभरातील आपल्या कंपन्यांच्या 30,000 कर्मचार्‍यांना पाठवलेल्या नोट मध्ये म्हटले आहे की, कर्मचार्‍यांना काम करण्याचे हे नवीन मार्ग अवलंबण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे क्वालिटी ऑफ लाइफ सुधारेल आणि प्रोडक्टिविटी वाढेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment