LIC ने कोरोना काळात रचला विक्रम ! 2019-20 मध्ये झाली 2.19 कोटी नवीन विमा पॉलिसींची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 2019-20 या आर्थिक वर्षात विक्रमी 2.19 कोटी नवीन विमा पॉलिसींची विक्री केली. गेल्या सहा वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी कोविड -१९ संकट असूनही कंपनीने हा विक्रम केला आहे. तसेच, याच कालावधीत कॉर्पोरेशनने क्लेम सेटलमेंट अंतर्गत पॉलिसीधारकांना एकूण 159,770.32 कोटी रुपये दिले. या अंतर्गत एकूण 215.98 लाख दावे निकाली काढण्यात आले.

31 मार्चपर्यंत 1.78 लाख कोटी रुपयांचे प्रीमियम मिळाले
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 2019-20 च्या दरम्यान नवीन पॉलिसीवर मिळालेल्या प्रीमियमच्या आधारे नवीन व्यवसायात 25.17 टक्के वाढ नोंदली गेली. 31 मार्च 2020 पर्यंत कंपनीला या प्रमुख कंपनीखाली 1.78 लाख कोटी रुपयांचे नवीन प्रीमियम मिळाले. या काळात कंपनीचा बाजारातील हिस्सा 68.74 टक्के होता. 1956 च्या पांच करोड़च्या सुरुवातीच्या गुंतवणूकीपासून सुरू झालेल्या एलआयसीकडे 31,96,214.81 कोटी रुपयांची मालमत्ता आहे .

डिजिटल प्लॅटफॉर्म वाढवण्यावर दिला भर
एलआयसीने डिजिटल प्लॅटफॉर्म देखील डिझाईन केले असून त्याचा अनुभवही चांगला आहे. ग्राहक मोबाइल अ‍ॅपवर 34 लाख युझर्स आहेत. त्याशिवाय गुगल पे, पेटीएम, फोन पे सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रीमियम पेमेंट करण्याची सुविधादेखील दिली आहे. याशिवाय त्यांनी चॅटबोटही सुरू केले आहे.

1000 कोटी प्रीमियम ऑनलाईन मिळाले
लॉकडाऊनमध्ये एलआयसीला 1 हजार कोटींचा प्रीमियम ऑनलाईन मिळाला आहे. एलआयसीचे 95 टक्के नवीन प्रीमियम एजंट्समार्फत ऑफलाइन येत आहेत. पण आता कंपनीचे 12 लाख एजंटही घरी बसून ऑनलाईन प्रीमियम कलेक्शन करून पॉलिसीचे नूतनीकरण करीत आहेत. एलआयसीने याबाबत अ‍ॅप आणण्याचीही तयारी केली आहे. कोविडच्या काळात लोकांमध्ये जीवन विम्याबद्दल जागरूकता वाढली आहे. अशा परिस्थितीत, ऑनलाइन मार्ग ही केवळ काळाची गरज नाही तर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग देखील आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment