गुड न्यूज! ‘या’ कारणामुळं घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणाची शक्यता

नवी दिल्ली । वाढत्या महागाईच्या काळात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या काळात घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नैसर्गिक वायू (Natural Gas)च्या दरांमध्ये मोठ्या फरकानं कपात होणार आहे. दर सहा महिन्यांनी गॅसचे दर निश्चित करण्यात येतात. एप्रिल आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्यांमध्ये हे दर निश्चित करण्यात येतात. सध्या एप्रिल महिन्यांचे दर निश्चित झाले होते. आता ऑक्टोबरमध्ये नवे दर जाहीर केले जाणार आहेत.

त्यानुसार ऑक्टोबरमध्ये जाहीर केले जाणारे दर 1.90-1.94 डॉलर प्रति एमएमबीटीयू (MMBTU) इतके असू शकतात. जवळपास गेल्या दशकभरामध्ये नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घट असेल. गॅस निर्यात करणाऱ्या राष्ट्रांकडून बेंचमार्क दरांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२० पासून नैसर्गिक वायूच्या किमती निर्धरित करण्यात येणार आहेत. परिणामी गॅसचे दर कमी होऊन 1.90 वरुन 1.94 प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल यूनिट (MMBTU) इतके होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास एका वर्षात नैसर्गिक वायूच्या दरात कपात होण्याची ही तिसरी वेळ असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com