गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी बंद करण्यामागे केंद्रानं दिलं ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी (Subsidy) अनेकांच्या बँक खात्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. सरकारकडून मे महिन्यापासून सबसिडी देण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे. गरिबांना स्वस्त दरात एलपीजी सिलेंडर देण्यासाठी सबसिडी सुरु करण्यात आली. परंतु आता सिलेंडरवर मिळणारी सवलत जवळपास बंद झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी बंद करण्यामागचे स्पष्टीकरण दिलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने ट्विट करत सांगितलं कि, ”गॅल सिलेंडरचं बाजार मूल्य म्हणजेच विना सबसिडी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. या दरम्यान अनुदानित अर्थात सबसिडीवाल्या सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे दोन्ही सिलेंडरच्या किंमती जवळपास समान झाल्या आहेत. या कारणामुळे मे-जून महिन्यात सिलेंडरवर मिळणारी सबसिडी बंद आहे.’

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात 14.2 किलोग्रॅम गॅस सिलेंडरचं बाजार मूल्य (Market rate), म्हणजे विना सबसिडी सिलेंडरची किंमत 637 रुपये होती. जी कमी होऊन आता 594 रुपये झाली आहे. त्याउलट, सबसिडीवाल्या सिलेंडरच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजे 494.35 रुपयांत मिळणाऱ्या सिलेंडरची किंमत वाढून 594 रुपये झाली आहे. त्यामुळे सबसिडी आणि विना सबसिडी सिलेंडरची किंमत समान आहे.

देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी लोकांना गॅस सिलेंडर सबसिडीचा लाभ मिळतो. अधिकतर महानगरांमध्ये सबसिडी जवळपास बंद झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. परंतु काही दूर भागात राहणाऱ्या लाभार्थिंना अतिशय कमी 20 रुपयांपर्यंतची सबसिडी दिली जात आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने 34,085 कोटी रुपये एलपीजी सबसिडीसाठी दिले होते. तर 2020-21 साठी जवळपास 37,256.21 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment