अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. क्रिकेटच्या मैदानावरील कुठल्याही कठीण परिस्थितीत महेंद्रसिंग धोनी आपले मन थंड ठेवून अत्यंत चतुर निर्णय घेत असे. यामुळेच क्रिकेट क्षेत्रातील सर्वात खास खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश केला जातो. पण याखेरीज आणखी एक गोष्ट अशीही आहे कि, ज्यामुळे एमएस धोनीचा अं​दाज हा त्याला इतर खेळाडूंपेक्षा वेगळा बनवतो. 39 वर्षीय हा दिग्गज कमाईच्या बाबतीतही इतर क्रिकेटपटूंपेक्षा वेगळाच आहे.

GQ India च्या म्हणण्यानुसार एमएस धोनीची एकूण मालमत्ता ही सुमारे 750 ते 800 कोटी रुपये आहे. चला तर मग तो क्रिकेट सोडून आणखी कोठून पैसे कमवतो त्याविषयी जाणून घेऊयात:

स्पोर्टिंग टीमः कॅप्टन कूल देखील अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी इतर प्रकारच्या खेळांमध्ये गुंतवणूक केली आहे. एकेकाळी फुटबॉलमध्ये गोलकीपर होण्याचे स्वप्न पाहणारा धोनी भारतीय सुपर लीग संघ ‘चेन्नईन एफसी’ चा मालक आहे. या व्यतिरिक्त त्याने आपल्या व्यवसायात मोटार वाहनांबद्दलची आवडदेखील समाविष्ट केली आहे. त्याच्याकडे उत्तम बाइक आणि कारचा उत्तम ताफाही आहे, तसेच याशिवाय सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये धोनीकडे ‘माही रेसिंग टीम इंडिया’ आहे. अभिनेता अक्किनेनी नागार्जुनबरोबर भागीदारीत हा संघ त्याच्या मालकीचा आहे. त्याची यादी इथंच संपत नाही. त्याच्याकडे हॉकी संघही आहे. या संघाचे नाव रांची राग, हॉकी क्लब ऑफ रांची असे आहे.

ब्रॅण्ड्स: एमएस धोनीला 2016 मध्ये अपेरल ब्रँड ‘सेव्हन’ चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होण्यासाठी सांगितले गेले होते. यानंतर, त्याने या ब्रँडच्या फुटवेअर कलेक्शनची मालकी घेतली. यासाठी त्यांच्याकडे स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक जिम देखील आहे. या कंपनीची देशभरात 200 हून अधिक जिम आहेत.

हॉस्पिटिबिलिटी इंडस्ट्रीः एमएस धोनी हॉस्पिटिबिलिटी इंडस्ट्रीमधूनही कमाई करतो. झारखंडमध्ये त्याचे एक हॉटेल आहे, त्याला ‘हॉटेल माही रेसिडेन्सी’ असे नाव आहे. हे एकमेव हॉटेल आहे आणि इतर कोठेही त्याची शाखा नाही.

एन्डोर्समेंट्स: कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच धोनीकडे अनेक एंडॉसमेंट् आहेत. सध्या त्याच्याकडे पेप्सी, स्टार, गोड्डा, बोस, स्नीकर्स, व्हिडिओकॉन, बूस्ट, ओरिएंट इलेक्ट्रिक, नेटमेड्स या ब्रँड्सबरोबरचे करार आहेत.

फोर्ब्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे
स्पोर्ट्स वेबसाइट क्लच पॉइंट्सच्या मते, महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा खेळाडू आहे. त्याच्यावर चेन्नई सुपरकिंग्जसह 21 लाख डॉलर्सचा करार आहे. विराट कोहली 24 लाख डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे. 2014 आणि 2015 मध्ये फोर्ब्स टॉप 100 अ‍ॅथलीटमध्ये स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू होता. यावेळी त्याचे रँकिंग अनुक्रमे 22 आणि 23 होते. या यादीत त्याची सर्वोत्कृष्ट रँकिंग 16 व्या क्रमांकाची आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment