मोदी सरकार महिला क्रेडिट योजने अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करत आहे? यामागील सत्य काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकार ‘पंतप्रधान क्रेडिट योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात 3 लाख रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारी एक बातमी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा या बातमीचा तपास केला गेला तेव्हा ती पूर्णपणे बनावट असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करण्यासाठी अशा अनेक बातम्या हल्ली व्हायरल होत आहेत, केंद्र सरकार सतत लोकांना हे टाळण्यासाठी जागरूक करत आहे.

या व्हायरल बातम्यांमध्ये असा दावा केला जात आहे
या बातमीत असे म्हटले जात आहे की, ‘प्रधानमंत्री क्रेडिट योजना’ अंतर्गत केंद्र सरकार सर्व महिलांच्या खात्यात तीन लाख रुपयांची रक्कम जमा करत आहे. भारत सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने स्पष्टपणे म्हटले आहे की, ही बातमी बनावट आहे. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही किंवा सरकार अशी कोणतीही योजना चालवित नाही.

https://twitter.com/PIBFactCheck/status/1329370564213886977?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1329370564213886977%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fbusiness%2Ffact-check-modi-govt-deposite-3-lakh-rupees-in-ladies-bank-accounts-under-pradhanmantri-credit-yojana-3344616.html

PIB Fact Checkने हे ट्विट केले होते “दावा: एका यूट्यूब व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री क्रेडिट योजना’ अंतर्गत सर्व महिलांच्या खात्यात 3 लाखांची रोख रक्कम देत आहे. PIB Fact Check: हा दावा बनावट आहे. अशी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवित नाही. ”

यापूर्वी देखील एका दुसर्‍या यूट्यूब व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला होता की, केंद्र सरकारच्या वतीने ‘प्रधानमंत्री महिला सन्मान योजने’ अंतर्गत महिलांना दरमहा 2000 डॉलर्स दिले जात आहेत. केंद्र सरकार अशी कोणतीही योजना चालवित नाही, असे ट्विट करून पीआयबी फॅक्ट चेकने हे स्पष्ट केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment